Indians are ahead to get citizenship of rich countries, USA is the First Choice. Dainik Gomantak
देश

श्रीमंत देशांचे नागरिकत्व घेण्यात भारतीय आघाडीवर, 'एम्पायर ऑफ लिबर्टी'ला पहिली पसंती

Citizenship Of Rich countries: बरेच लोक स्टडी व्हिसावर परदेशात जातात. पदवीनंतर पोस्ट स्टडी वर्क व्हिसासाठी अर्ज करतात. त्यानंतर चांगली नोकरी मिळाली की ते कायमस्वरूपी नागरिकत्वासाठी अर्ज करतात आणि नागरिकत्व घेतात.

Ashutosh Masgaunde

Indians are ahead to get citizenship of rich countries, USA is the First Choice:

जगातील श्रीमंत देशांचे नागरिकत्व मिळवण्यात भारतीय लोक आघाडीवर असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे.

यामध्येही 'एम्पायर ऑफ लिबर्टी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेला नागरिकत्व घेताना भारतीय लोकांची पहिली पसंती आहे.

नागरिकत्व देण्यात अमेरिका आघाडीवर

2021 मध्ये, सुमारे 1.3 लाख भारतीयांनी OECD सदस्य देशाचे नागरिकत्व प्राप्त केले आहे. 2019 मध्ये हा आकडा सुमारे 1.5 लाख होता.

2021 मध्ये यामध्ये चीन पाचव्या क्रमांकावर आला कारण सुमारे 57,000 चिनी लोकांनी OECD देशाचे नागरिकत्व मिळवले.

2021 मध्ये भारतीय स्थलांतरितांना पासपोर्ट देणारे 38 सदस्यीय OECD मधील अव्वल तीन देश यूएस (56,000), ऑस्ट्रेलिया (24,000) आणि कॅनडा (21,000) आहेत.

भारतीय लोक का स्वीकारताहेत परदेशी नागरिकत्व ?

शिक्षण

बरेच लोक स्टडी व्हिसावर परदेशात जातात. पदवीनंतर पोस्ट स्टडी वर्क व्हिसासाठी अर्ज करतात. त्यानंतर चांगली नोकरी मिळाली की ते कायमस्वरूपी नागरिकत्वासाठी अर्ज करतात आणि नागरिकत्व घेतात.

प्रवासाची सोय:

परदेशी नागरिकत्वामुळे देशात आणि परदेशात प्रवास करणे सोपे होते. अमेरिका आणि कॅनडा सारख्या देशांचे पासपोर्ट असल्‍याने अनेक देशांना व्हिसाशिवाय जाण्‍याची सुविधा मिळते.

सामाजिक सुरक्षा लाभ:

अनेक देश इतर देशांतील वैयक्तिक नागरिकांना सामाजिक सुरक्षा लाभ मिळण्याची परवानगी देतात.

आकर्षक नोकऱ्या:

परदेशातही सरकारी आणि संवेदनशील क्षेत्रात नोकऱ्यांच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे भारतीय लोक परदेशी नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

किती भारतीयांनी नागरिकत्व सोडले?

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) भारतीयांमध्ये कॅनडा किती लोकप्रिय आहे हे नुकतेच उघड केले आहे. जानेवारी 2018 ते जून 2023 या कालावधीत, 1.6 लाख किंवा जवळपास 20% भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडून कॅनडाची निवड केली आहे.

या यादीत अमेरिका आघाडीवर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंगडम यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले.

या कालावधीत नागरिकत्व सोडणाऱ्या एकूण ८.४ लाख भारतीयांपैकी लक्षणीय ५८.४% लोकांनी युनायटेड स्टेट्स आणि कॅनडाचे नागरिक होण्याचा पर्याय निवडला आहे.

नागरिकत्व देण्यात कॅनडाचा वेग

पॅरिस-इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुकमध्ये प्रसिद्ध झालेल्या OECD अहवालानुसार, 2023 मध्ये श्रीमंत देशाचे नागरिकत्व प्राप्त करणारा भारतीय हा सर्वात मोठा राष्ट्रीय गट आहे.

तसेच, 2021 आणि 2022 मधील नागरिकत्व अनुदानाच्या संख्येत कॅनडाने सर्वात मोठी (174%) प्रमाणात वाढ नोंदवली आहे.

गेल्या वर्षी OECD देशाचे नागरिकत्व घेणार्‍या परदेशी नागरिकांची संख्या सर्वाधिक 28 लाख होती. जी 2021 च्या तुलनेत 25% अधिक आहे.

2019 पासून ओईसीडी देशाचे नागरिकत्व मिळवण्याच्या बाबतीत भारत हा मूळ देश असल्याचे नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT