Goa Students: गोव्यातील 4 शालेय विद्यार्थ्यांना मिळणार पोर्तुगालला जायची संधी; क्विझ काँटेस्टचे आयोजन

दोन आठवड्यांची सहल, विद्यार्थ्यांच्या संघासमवेत एका शिक्षकालाही मिळणार संधी
Goa Students To Go Portugal:
Goa Students To Go Portugal:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Students To Go Portugal: गोव्यातील चार शालेय विद्यार्थ्यांना पोर्तुगालची सहल जिंकण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांना केवळ पोर्तुगीज भाषेबाबतची एक क्विझ काँटेस्ट (प्रश्न मंजुषा स्पर्धा) जिंकावी लागेल.

गोवा शिक्षण मंडळ आणि पोर्तुगालमधील Fundação Oriente यांच्यातील सामंजस्य करारामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे.

चार हुशार विद्यार्थ्यांना पोर्तुगालमधील लिस्बन आणि पोर्टो येथील दोन आठवड्यांची सहल जिंकण्याची संधी आहे.

गोव्यावर पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव आहे. पोर्तुगीज भाषेची गोडीही विद्यार्थी-शिक्षकांमध्ये दिसून येते. हीच आवड जोपासण्यासाठी आणि पोर्तुगीज भाषेच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी पूरक उपक्रम राबवले जात असतात.

Goa Students To Go Portugal:
BITS गोवा आयोजित करणार 'वेव्हज 2023' फेस्टिव्हल; बॉलीवूड नाईटसाठी येणार संगीतकार अमित त्रिवेदी

असाच एक उपक्रम म्हणजे 'स्टार्स ऑफ द फ्युचर'. याचा उद्देश केवळ Fundação Oriente आणि गोव्यातील शाळांमधील बंध मजबूत करणे हा नाही तर भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना पोर्तुगीज ही परदेशी भाषा म्हणून निवडण्यासाठी प्रेरित करणे हा आहे," असे Fundação Oriente in India चे प्रतिनिधी पाउलो गोम्स म्हणाले.

कोण सहभागी होऊ शकतो?

गोव्यातील ज्या शाळांमध्ये पोर्तुगीज भाषा शिकवली जाते, तेथील विद्यार्थ्यांना या प्रश्नमंजुषा स्पर्धेत (क्विझ काँटेस्ट) सहभागी होता येईल.

अशी असेल स्पर्धा

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दहा प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. हे प्रश्न कला, संगीत, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, विज्ञान, क्रीडा, चित्रपट इत्यादी विषयांवर असतील.

अंतिम स्पर्धा पोर्तुगालमध्ये

अंतिम स्पर्धकांच्या निवड टप्प्याबाबतचे सर्व कम्युनिकेशन आणि अंतिम स्पर्धा पोर्तुगालमध्ये होईल.

Goa Students To Go Portugal:
माका नाका प्लॅस्टिक! गोव्यातील अवलियाने थांबवला 20 लाख प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर...

पात्रता

एका शाळेतून चार संघ सहभागी होऊ शकतील. प्रत्येक संघात चार विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. त्यातील किमान एक विद्यार्थी पोर्तुगीज भाषा शिकत असावा.

स्पर्धा आणि प्रवेशिका

ही स्पर्धा 5 ते 9 डिसेंबर या काळात होईल. 19 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेशिका स्वीकारल्या जातील.

बक्षिस

विजेत्या संघाला 2024 मध्ये पोर्तुगालची सांस्कृतिक सहल आयोजित करण्यात येईल. यात चार विद्यार्थी आणि एक शिक्षक यांना संधी मिळेल. तसेच विजेत्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com