Indian students receive international award for pure water research  Dainik Gomantak
देश

‘कोड फॉर कॉल’मध्ये गोव्यातील विद्यार्थ्यांचा ठसा

शुद्ध पाण्याच्या संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार : विद्यार्थ्यांनी बनविले ॲप

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘आयबीएम’ (IBM) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संशोधनपर स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय विद्यार्थांनी (Indian Students) देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अभिमानाची बाब म्हणजे या पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये गोव्यातील (Goa Students) दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संकेत मराठे हा आग्नेल तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, तर हृषिकेश भंडारी हा मद्रास आयआयटीचा (IIT) विद्यार्थी असून तो ताळगावचा रहिवाशी आहे.

‘आयबीएम’ ही आंतरराष्ट्रीय संस्था जगभरातील विद्यार्थ्यांच्या विविध संशोधनांचे परीक्षण करते. निसर्ग, पर्यावरण, प्राणीदया, लोकोपयोगी जीवनमानावरील संशोधनावर या संस्थेकडून प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी विविध लोकोपयोगी संशोधनांसाठी संस्थेकडून उत्कृष्ट संशोधनासाठी पारितोषिक दिले जाते. यंदा पहिल्यांदाच हे पारितोषिक भारतातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला मिळाले आहे. पाच विद्यार्थ्यांनी केलेल्या या संशोधनात लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा हा उपक्रम मांडण्यात आला आहे.

काय आहे संशोधन?

जनसामान्यांना शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने भारतातील पाच विद्यार्थ्यांनी एक उपक्रम ‘आयबीएम’कडे सुपूर्द केला. या विद्यार्थ्यांनी एक ॲप तयार केले असून त्यानुसार स्वतःच पाण्याचे निरीक्षण करणे सोपे होणार आहे. पाणी प्रदुषित असेल, तर त्याची माहिती या ॲपद्वारे लोकांना मिळणार आहे. अलीकडे पाण्याच्या प्रदुषणाची समस्‍या जटिल बनली आहे. त्‍यामुळे हे संशोधन पुरस्कारास पात्र ठरले.

तब्बल दीड कोटींचे पारितोषिक

सदर संशोधनासाठी प्रथमच भारतीय विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. गोव्यातील विद्यार्थीदेखील नव्या संशोधनात सहभागी होत असल्याचे हे द्योतक आहे. या विद्या‍र्थ्‍यांना ‘आयबीएम’ या संस्थेकडून तब्बल १ कोटी २२९ लाख ०५ हजार ४०० रूपयांचे पारितोषिक देण्यात जाहीर झाले आहे.

पहिल्यांदाच भारताला हा मान मिळत असल्याने अभिमान तर वाटणारच ना! आम्ही लोकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी कसोशीने या प्रकल्पावर काम केले. त्याची ही पोचपावती आहे.

-संकेत मराठे, आग्नेल तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT