Indian Navy Dainik Gomantak
देश

Indian Navy: भारतीय लष्करात देशातील महिलांना सुवर्ण संधी, भारतीय नौदलाचा ऐतिहासिक निर्णय

Indian Navy MARCOS for Women: भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना कमांडो म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय नौदलाने महिलांना लष्कारात सुवर्ण संधी दिली आहे. आता देशाच्या महिलांना कमांडो म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. लावकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये महिलांचा समावेश करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पहिल्यांदाच महिलांना लष्करामध्ये कमांडो म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  • लष्करात पहिल्यांदाच महिलांना कमांडो होण्याची संधी

लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये असणाऱ्या कमांडोंना (Commando) कठोर प्रशिक्षण दिले जाते. या कमांडोंवर विशेष आणि गुप्त ऑपरेशन्स करण्याची जबाबदारी असते. या कामामध्ये स्पेशल फोर्स कमांडो निपूण असतात. या कमांडोसाठी आतापर्यंत फक्त पुरुषांना परवानगी होती. पण आता भारतीय नौदल महिलांनाही कमांडो होण्याची संधी देणार आहे.

  • महिलांना मार्कोस होण्याची संधी

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रशिक्षणानंतर महिलांनी निकष पूर्ण केल्यास त्यांना नौदलात मरीन कमांडो ( Marine Commandos) म्हणजे मार्कोस (MARCOS) होण्याची संधी मिळेल. भारताच्या लष्करी इतिहासातील हे एक ऐतिहासिक पाऊल असेल. परंतु कोणालाही थेट विशेष दलात सामील केले जाणार नाही. महिला कमांडोंना स्वयंसेवक म्हणून काम करावे लागेल. पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणाऱ्या महिला अधिकारी (Officer) आणि नाविक (Sailors) यांना मार्कोस (MARCOS) प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: घरबसल्या बघा 'इफ्फी'चा सोहळा! Live Streaming साठी प्रसारभारतीने दिली 'ही' खास सुविधा..

Morjim: मोरजीत 'कॅसिनो'ला थारा नाही! आमदार आरोलकरांचा स्थानिकांना पाठिंबा; परवाने मागे घ्‍यायची मागणी

Viriato Fernandes: 'मोठ्या माशांची नावे अजूनही बाहेर येत नाहीत', Cash For Job विषय संसदेच्‍या चर्चेत आणू; विरियातोंचे मोठे विधान

IFFI 2024: 'इफ्‍फी'साठी लखलखाट! 600 आकाशकंदीलांनी सजणार दयानंद बांदोडकर मार्ग

Ramesh Tawadkar: 'आता गावडेंवर काय कारवाई होते पाहू'; मंत्र्यांच्या कामगिरीबाबत तवडकरांचा सरकारला घरचा आहेर

SCROLL FOR NEXT