CM Sukhvinder Singh Sukhu: सुक्खु यांच्या शपथविधीत राहुल, प्रियांका यांच्या कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

सुखविंदर सिंग सुक्खु बनले हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री
CM Sukhvinder Singh Sukhu
CM Sukhvinder Singh SukhuDainik Gomantak
Published on
Updated on

CM Sukhvinder Singh Sukhu: हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग सुक्खु यांनी शपथ घेतली. ते राज्याचे 15 वे मुख्यमंत्री आहेत. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यात राहुल आणि प्रियांका गांधींच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

CM Sukhvinder Singh Sukhu
PM मोदींची मराठीतून भाषणाची सुरुवात, काय म्हणाले वाचा एका क्लिकवर

प्रियांका गांधी यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील दावेदार प्रतिभा सिंह यांना आपल्या शेजारी बसवले. सुक्खू यांनी सर्व आमदारांसह मंचावरून समर्थकांना अभिवादन केले. व्यासपीठासमोर बसलेल्या आईला सुखविंदर सिंग सुक्खू यांनी मिठी मारली. त्यावेळी लगेचच राहुल गांधींनी सुक्खु यांच्या मातोश्रींना व्यासपीठावर बोलावून घेत त्यांना मान्यवरांमध्ये स्थान दिले. राहुल गांधींची ही कृती आणि प्रियांका गांधींनी प्रतिभा सिंह यांना शेजारी बसवून घेणे, या कृतीची चर्चा घटनास्थळी रंगली होती.

रिज मैदानावर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ यांनी सुक्खू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांना शपथ दिली. प्रतिभा सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन सुखविंदर सिंग सुक्खू यांचे अभिनंदन केले. एकजुटीने काम करू, असेही त्या म्हणाल्या.

CM Sukhvinder Singh Sukhu
Madhya Pradesh: दोन्ही हात तोडून बापानेच केली 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, विचित्र कारण आले समोर

तत्पूर्वी सकाळी सुक्खू यांनी स्वत: प्रतिभा सिंह यांना शपथविधीसाठी निमंत्रण दिले होते, त्यावेळी, माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे, मुख्यमंत्रीपद नंतर येते. प्रतिभा सिंह माझ्या आदर्श आहेत, अशी प्रतिक्रिया सुक्खू यांनी दिली होती.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू चौथ्यांदा तर मुकेश अग्निहोत्री पाचव्यांदा विधानसभेत निवडून आले आहेत. यापूर्वी, सखू यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, एनएसयूआयचे अध्यक्ष, शिमला महापालिकेचे दोन वेळा नगरसेवक, युवक काँग्रेसचे प्रमुख आणि 2022 मध्ये निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com