MH-60R Romeo Helicopter Dainik Gomantak
देश

समुद्राचा नवा 'सिकंदर'! भारतीय नौदलात 'रोमियो' हेलिकॉप्टरचा दुसरा स्क्वॉड्रन दाखल; चीन-पाकिस्तानच्या पाणबुड्यांना शोधून मारणार VIDEO

Romeo Helicopter Features: भारतीय नौदलाने आपल्या सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले.

Manish Jadhav

MH-60R Romeo Helicopter: भारतीय नौदलाने आपल्या सागरी सीमांच्या सुरक्षेसाठी आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले. नौदलाने आपले नवीन MH-60R हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन INAS 335 ‘OSPREY’ अधिकृतपणे कार्यान्वित (Commission) केले. या हेलिकॉप्टरला 'रोमियो' या नावाने ओळखले जाते. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष सोहळा पार पडला. हिंद महासागरातील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी 'रोमियो'चे आगमन भारतीय नौदलासाठी गेमचेंजर ठरणार आहे.

शत्रूच्या पाणबुड्यांचा कर्दनकाळ

MH-60R 'रोमियो' हेलिकॉप्टरची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, समुद्रात जर एखादा शत्रू देश घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे हेलिकॉप्टर त्यांच्या पाणबुड्यांना शोधून-शोधून नष्ट करेल. जगातील सर्वात आधुनिक 'मल्टी-मिशन' हेलिकॉप्टर्समध्ये याची गणना होते. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन या कंपनीने याची निर्मिती केली असून हे अमेरिकन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख शस्त्र आहे.

'रोमियो' हेलिकॉप्टरची अद्भूत वैशिष्ट्ये

हे केवळ एक हेलिकॉप्टर नसून समुद्रातील (Sea) चालते-फिरते अत्याधुनिक शस्त्र आहे. रोमियो हेलिकॉप्टर 'हेलफायर' मिसाइल, 'मार्क-54' टॉरपीडो, रॉकेट्स आणि आधुनिक मशिन गन्सनी सज्ज आहे. खोल समुद्रात लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा अचूक पत्ता लावण्यासाठी यामध्ये हाय-टेक सेन्सर्स आणि सोनार यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामध्ये इन्फ्रारेड डिवाइसेस आहेत, जे शत्रूच्या हल्ल्याचा धोका ओळखून स्वतःहून सक्रिय होतात, ज्यामुळे हेलिकॉप्टर सुरक्षित राहते. हे हेलिकॉप्टर भारतीय विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत वरुन सहज उड्डाण करु शकते आणि तिथेच लँडिंगही करु शकते.

हिंद महासागरात चीनवर राहणार नजर

2020 मध्ये भारताने (India) अमेरिकेशी 24 MH-60R हेलिकॉप्टर्सचा करार केला होता. यातील पहिले स्क्वॉड्रन (INAS 334) मार्च 2024 मध्ये कोची येथे तैनात करण्यात आले होते. आता हे दुसरे संपूर्ण स्क्वॉड्रन सज्ज झाल्यामुळे भारताची ताकद दुप्पट झाली आहे. विशेषतः हिंद महासागर आणि अरबी समुद्रात वाढती चिनी घुसखोरी रोखण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.

नौदल अधिकाऱ्यांच्या मते, हे हेलिकॉप्टर शत्रूच्या पाणबुड्यांना त्यांच्या हद्दीतच ट्रॅक करुन उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवते. यामुळे भारतीय जहाजांच्या सुरक्षेचे कवच अधिक मजबूत झाले आहे. प्रशांत महासागर असो वा अरबी समुद्र, 'रोमियो' आता भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News Live: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

Porvorim News: पर्वरीच्या रस्त्यावर 'बिअर'चा पूर! धावत्या ट्रकवरून बॉक्स कोसळले, काचेच्या तुकड्यांमुळे वाहतूक धोक्यात

Viral Video: संसद की कुस्तीचा आखाडा? लोकशाहीच्या पवित्र मंदिरात महिला खासदारांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; एकमेकींचे केस ओढले अन् थप्पडही लगावले

SCROLL FOR NEXT