PM मोदी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. येथे पोहोचताच त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
युद्धनौकांचे लोकार्पण: पंतप्रधान मोदींनी मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे नौदलाच्या तीन प्रमुख लढाऊ जहाजे आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वागशीर यांचे लोकार्पण केले.
जागतिक नेता: तीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजांचा समावेश हा संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेत जागतिक नेता होण्याचे भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
आयएनएस निलगिरी: निलगिरी फ्रिगेटवर दुश्मनांशी लढण्यासाठी वेपन्स आणि मिसाईल्स आहेत. यामध्ये प्रामुख्याने आठ ब्रह्मोस मिसाईल आहेत.
INS सूरत युद्धनौका: INS विशाखापटनम, INS मोरम्युगाव आणि INS इंफाळ नंतर प्रोजेक्ट 15B ची शेवटची युद्धनौका INS सूरत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
सुसज्ज: आयएनएस सूरत युद्धनौकेची लांबी 164 मीटर असून रुंदी 18 मीटर तर वजन 7600 टन आहे. शत्रूंवर तिन्ही बाजूंनी मारा करण्यासाठी इथे सुद्धा ब्रह्मोस मिसाइल, बराक मिसाईल, पाणबुड्या विरोधी रॉकेट लॉन्चर आणि स्पेशल भारतीय बनावटीच्या गन्स आहेत.
आयएनएस वाघशीर: भारतीय नौदलात सायलेंट किलर म्हणून ओळख असलेली INS वाघशीर पाणबुडी प्रोजेक्ट 75 च्या स्कॉर्पियन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे.