Sanjay Jaju Dainik Gomantak
देश

Indian Cinema as Soft Power'भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर नावलौकिक मिळतोय'; 10व्या AIFF ला केंद्रीय सचिव संजय जाजू यांनी लावली हजेरी

Global influence of Bollywood:चित्रपट ही भारताची 'सॉफ्ट पॉवर' आहे. आज भारतीय चित्रपटानं अवघं जग व्यापून टाकलं आहे. भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर आपली छाप सोडत आहेत.

Manish Jadhav

10th Ajanta Ellora International Film Festival: चित्रपट ही भारताची 'सॉफ्ट पॉवर' आहे. आज भारतीय चित्रपटानं अवघं जग व्यापून टाकलं आहे. भारतीय चित्रपट जागतिक स्तरावर आपली छाप सोडत आहेत. मोठ्या प्रमाणावर जागतिक प्रेक्षक भारतीय चित्रपटांकडे आकर्षित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सातत्याने चित्रपटाच्या महत्वावर प्रकाश टाकला आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितले. संभाजीनगर येथील 10व्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात ते बोलत होते.

दरम्यान, 15 जानेवारी रोजी (बुधवारी) मोहत्सवाच्या उद्धाटन समारंभाला जाजू उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना आपला कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. तथापि, दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (16 जानेवारी) जाजू यांनी मोहत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आयोजक आणि प्रेक्षकांशी मुक्तपणे संवाद साधला. मोहत्सवाचे मानद अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर, आयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, मोहत्सव संचालक सुनील सुकथनकर, कलात्मक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, सर्जनशील दिग्दर्शक जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग, शिव कुमार यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले.

जाजू यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलताना भारताला लाभलेल्या सांस्कृतिक वारशा प्रकाश टाकला. जाजू म्हणाले की, ''चित्रपट हा प्राचीन नाट्यशास्त्रातील कला, नाटक, नृत्य, संगीताच्या भारताच्या दिर्घ आणि समृद्ध वारशात आधुनिक भर घालतो. मी केंद्रीय सचिनपदाची सूत्रे स्वीकारुन एक वर्ष झाले आहे. याकाळात मला संभाजीनगर येथे होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात सांस्कृतिक चैतन्य आणि चित्रपटसृष्टीतील विविधता पाहण्याची संधी मिळाली.''

संभाजीनगरमध्ये होत असलेल्या या मोहत्सवाला हजेरी लावल्याबद्दल जाजू यांनी आनंद व्यक्त केला. आशुतोष गोवारीकर यांच्या मास्टरक्लासलाही त्यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांशी बोलताना त्यांनी आश्वस्त केले की, ''भारत (India) सरकार एआयएफएफ सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना पूर्ण पाठिंबा देईल. तसेच, सरकार अशा उल्लेखनीय उपक्रमांना चालना देण्यासाठीही वचनबद्ध आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT