Kerala Crime: सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला केरळ कोर्टाचा दणका; सुनावली 141 वर्षांची शिक्षा!

Kerala Court: केरळच्या एका न्यायालयाने एका व्यक्तीला दोषी ठरवून 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आई घरी नसताना नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला केरळ कोर्टाचा दणका; सुनावली 141 वर्षांची शिक्षा!
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

Kerala Crime: केरळच्या एका न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एका व्यक्तीला दोषी ठरवून 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आई घरी नसताना नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. मंजेरी फास्ट ट्रॅक स्पेशल न्यायालयाचे न्यायाधीश अश्रफ ए एम यांनी या नराधमाला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायदा, आयपीसी आणि बाल न्याय कायद्याच्या विविध तरतुदींनुसार एकूण 141 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

तथापि, त्या व्यक्तीला 40 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल, कारण त्याला दिलेल्या तुरुंगवासाची शिक्षा सर्वोच्च होती आणि 29 नोव्हेंबरच्या न्यायालयाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या शिक्षा एकाच वेळी या व्यक्तीला भोगाव्या लागणार आहेत. शिक्षेशिवाय न्यायालयाने (Court) या दोषी व्यक्तीला 7.85 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. तसेच, न्यायालयाने पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

दोषी आणि पीडिता हे तामिळनाडूचे (Tamli Nadu) रहिवासी असून सावत्र वडील 2017 पासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते, असे या प्रकरणाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एका मित्राच्या सल्ल्यानुसार, मुलीने या धक्कादायक घटनेविषयी तिच्या आईला सांगितले आणि आईने पुढे पोलिसांना कळवले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com