Indian Army  Dainik Gomantak
देश

India Vs China: ड्रॅगनचे मनसुबे उधळून लावण्याची तयारी, पाकसाठीही धोक्याची घंटा; आता ड्रोन...

Indian Army: देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कराचे प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने लष्कराने सुमारे दोन हजार ड्रोन खरेदीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

India Vs China: देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कराचे प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने लष्कराने सुमारे दोन हजार ड्रोन खरेदीचे आदेश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापैकी काही फॉरवर्ड पोस्टवर तर काही पाळत ठेवण्यासाठी वापरले जातील. ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष स्मित शाह म्हणाले की, यासंदर्भात उत्पादकांमध्ये बोली लावण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.

दरम्यान, भारत (India) आणि चीनच्या सैन्यात सीमेवर चकमक सुरु असताना भारताने सुरक्षेच्या दिशेने हे पाऊल उचलले आहे. त्याचवेळी पाकिस्तानकडून (Pakistan) सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न थांबलेले नाहीत. त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोन्स तात्काळ पुरवण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील अतिउंचीच्या भागात वाढलेला तणाव पाहता ही घाई दाखवली जात आहे.

अहवालानुसार, लॉजिस्टिक सपोर्टसाठी सुमारे 400 ड्रोन आणि पाळत ठेवण्यासाठी सुमारे 1,500 ड्रोन खरेदी केले जात आहेत. रसद पुरवण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रोन 5 ते 40 किलोपर्यंत भार वाहून नेण्यास सक्षम असतील. याद्वारे फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी विविध प्रकारचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच, हे ड्रोन 5 ते 20 किमी दरम्यान कुठेही प्रवास करण्यास सक्षम असतील.

हे ड्रोन 4 ते 6 तास उड्डाण करु शकतील

ड्रोन फेडरेशनचे अध्यक्ष शाह पुढे म्हणाले की, 'या ड्रोनची रेंज जरी खूप जास्त नसली तरी ते अत्यंत अवघड मार्गांवरुन जातील. पाळत ठेवणाऱ्या ड्रोनचा वेग वेगवेगळा असतो आणि ते वेगवेगळ्या कालावधीसाठी हवेत राहू शकतात. उच्च उंचीवर आणि कमी स्तरावर कार्य करण्यास सक्षम ड्रोनसाठी ऑर्डर देण्यात आल्या आहेत. ऑर्डर केलेले ड्रोन 90 मिनिटांपासून 4-6 तासांपर्यंत उड्डाण करु शकतात.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT