India-China Conflict: तवांग संघर्षानंतर चीनकडून 10 लढाऊ विमाने सीमेवर तैनात; 7 ड्रोनद्वारे टेहळणी...

अमेरिका भारताच्या बाजुने, बळाच्या जोरावर सीमेत बदल केल्यास विरोध करणार
India-China Conflict:
India-China Conflict:Dainik Gomantak
Published on
Updated on

India-China Conflict: अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर तिसऱ्याच दिवशी चीनने शिगात्से पीस विमानतळावर 10 विमाने तैनात केली आहेत. उपग्रह छायाचित्रांतून हे उघड झाले आहे. मॅक्सर टेक्नॉलॉजीजने ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

India-China Conflict:
Iran Anti-Hijab Protests: इराणमध्ये हिजाबविरोधी 400 आंदोलकांना सुनावली 'ही' शिक्षा

ही चीनी लढाऊ विमाने प्रत्यक्ष ताबा रेषेपासून सुमारे 155 किलोमीटर अंतरावर आहेत. चीन या विमानतळाचा वापर लष्करी आणि नागरी कारणांसाठी करतो. चिनी हवाई दलाची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन येथे तैनात आहेत. येथून भारतीय सीमारेषा जवळ आहे. विशेष म्हणजे, सॅटेलाइट इमेजमध्ये 7 ड्रोनही दिसत आहेत. या ड्रोनचा वापर सीमेवर टेहळणीसाठी केला जात असल्याचा संशय आहे.

याबाबत बोलताना अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी पॅट रायडर म्हणाले, चीन चिथावणी देत आहे. चीन LAC जवळ सैन्य जमा करत आहे. येथे त्यांनी लष्करी पायाभूत सुविधाही उभारल्या आहेत. भारत ही परिस्थिती सावधपणे हाताळण्याचा प्रयत्न करत आहे आणि अमेरिकेचा भारताला पाठिंबा आहे. आम्ही आमच्या मित्र देशांच्या सुरक्षेचा निर्णय घेऊ. कोणत्याही देशाने बळाच्या बळाच्या जोरावर आणि एकतर्फी सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकेचा त्याला विरोध असेल.

India-China Conflict:
Sri Lanka: श्रीलंकेतील अल्पसंख्याक तमिळांबाबत ' हा ' निर्णय घेण्यासाठी भारताचा दबाव

दरम्यान, तवांगमधील संघर्षाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 9 डिसेंबर रोजी तवांगमधील यंगस्टे येथे 17 हजार फूट उंचीवरील भारतीय चौकी हटवण्यासाठी 600 चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करत होते. ते काटेरी काठ्या आणि इलेक्ट्रिक बॅटनने सज्ज होते. भारतीय लष्करानेही त्यांना काटेरी काठ्या आणि रॉडने प्रत्युत्तर दिले. गेल्या वर्षी 200 चिनी सैनिकांनी तवांग भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. तेव्हाही तो प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com