Indian Army top commanders meeting to discuss issue on LAC, Jammu-Kashmir & Afghanistan issue Dainik Gomantak
देश

LAC,काश्मीर,अफगाणिस्तान मुद्द्यांवर भारतीय लष्कराची आज बैठक

या बैठकीत एलएसी (LAC)तसेच देशाच्या इतर सुरक्षा आव्हानांचा आढावा घेतला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

पूर्व लडाखमध्ये (Ladakh) चीनसोबत (China) सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, आज भारतीय लष्कराच्या (Indian Army) सर्वोच्च कमांडर्सची एक बैठक होणार आहे.या बैठकीत एलएसी (LAC)तसेच देशाच्या इतर सुरक्षा आव्हानांचा आढावा घेतला जाणार आहे.आजपासून चार दिवस चालणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) सुरक्षा परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने, गेल्या काही आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या नागरिकांच्या हत्येच्या संदर्भात लष्करी कमांडर्सची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. असे सांगितले आहे. (Indian Army top commanders meeting to discuss issue on LAC, Jammu-Kashmir & Afghanistan issue)

दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लष्करी कमांडर्सना संबोधित करतील. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे आणि सर्वोच्च कमांडर पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यांमधील संघर्षात देशाच्या लष्करी तयारीचा आढावा घेतील. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) अनेक ठिकाणी दोन्ही देशांमधील संघर्ष गेल्या 17 महिन्यांपासून सुरूच आहे.

त्याचबरोबर अफगाणिस्तानात तालिबानच्या ताब्यानंतर भारत आणि आजूबाजूंच्या देशात निर्माण झालेल्या सुरक्षेच्या परिस्थितीवरही लष्करी कमांडर चर्चा करू शकतात, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे . लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, "दुसरी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल. लष्करी कमांडर परिषद, दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात आयोजित केली जाते, हा एक उच्चस्तरीय द्विवार्षिक कार्यक्रम आहे."

पूर्व लडाखमधील सद्यस्थिती आणि भारतीय लष्कराच्या सज्जतेचा मुद्दा या परिषदेत प्रथमस्थानी असणार आहे. गतवर्षी 5 मे रोजी विरोध सुरू झाल्यापासून, दोन्ही देशांनी सीमेवरील तणाव कमी करण्याच्या मुद्द्यांवरून तसेच य सीमेवरून सैन्य मागे घेण्याच्या उद्देशाने लष्करी चर्चेच्या 13 फेऱ्या केल्या आहेत. दोन्ही पक्षांनी लष्करी आणि मुत्सद्दी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये पांगोंग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे.तत्पूर्वी पॅनगॉन्ग लेक परिसरात दोन्ही देशांमध्ये हिंसक चकमक झाली होती आणि त्यानंतर दोन्ही देशांनी अनेक ठिकाणी हत्यारांसह हजारो सैनिक तैनात केले होते. 15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. चकमकीनंतर आठ महिन्यांनी चीननेही आपले चार लष्करी जवान ठार झाल्याचे मान्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vivo Y500i launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, किंमत फक्त...

Goa Assembly Session: हिवाळी अधिवेशनाचा हायव्होल्टेज प्रारंभ! 'हडफडे' अग्नितांडवावरून विरोधक आक्रमक; राज्यपालांच्या भाषणदरम्यान 'शेम-शेम'च्या घोषणा

T20 World Cup: ICC चा मोठा निर्णय! बांगलादेशची मागणी धुडकावली; आता भारतातच खेळावं लागणार

Goa Winter Session: 'कुशावती' जिल्हा म्हणजे 'विकसित गोवा 2037' कडे टाकलेले मोठे पाऊल! राज्यपालांचे प्रतिपादन

Makar Sankranti 2026 : मकरसंक्रांतीच्या गोडव्यावर महागाईचे सावट! साहित्याचे दर वाढले; वाण खरेदीसाठी बाजारात लगबग

SCROLL FOR NEXT