Indian Army NCC Recruitment 2021 Dainik Gomantak
देश

Indian Army NCC Recruitment 2021: 56 हजारापर्यंत असणार पगार, असा करा अर्ज

भारतीय सैन्य दलात NCC विशेष प्रवेश योजना 2021 साठी उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय सैन्य दलात NCC विशेष प्रवेश योजना 2021 साठी उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहे. मात्र अविवाहित महिला आणि पुरूषच या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवार 15 जुलैच्या आत भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाइटवर जावून अर्ज करू शकतात. (Indian Army NCC Recruitment 2021 Salary will be up to 56 thousand)

या पदासाठी एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्यापैकी 5 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय सैन्यात 14 वर्षे, म्हणजे प्रारंभिक 10 वर्षांच्या मुदतीसाठी नियुक्त केले जाईल, ज्यात 4 वर्षांची मुदत वाढ करता येणार आहे.

भारतीय सेना एनसीसी भरती 2021: शैक्षणिक पात्रता

अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून किमान 50 टक्के गुणांनी पास असणे आवश्यक आहे. जे लोक पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादाः 1 जुलै 2021 रोजी अर्जदारांचे वय 18 ते 25 वर्षे पुर्ण असणे गरजेचे आहे. अधिकृत निवेदनानुसार मॅट्रिक / माध्यमिक शालांन्त परीक्षा प्रमाणपत्रावर नोंदलेली जन्मतारीख असेलले प्रमाणपत्रच स्वीकारले जाईल.

भारतीय सेना एसएससी-एनसीसी भरती 2021: अर्ज प्रक्रिया

  • स्टेप्स1: भारतीय सैन्याच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या

  • स्टेप्स 2 : एकदा आपण होम पेजवर गेल्यावर 'अधिकारी निवड' अंतर्गत 'ऑफिसर एंट्री लॉगिन' टॅबवर क्लिक करा.

  • स्टेप्स 3: तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होइल. जिथे तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल

  • स्टेप्स 4: नोंदणी करण्यासाठी स्वत:चा सर्व आवश्यक तपशील एकदा सबमिट करा. आणि अ‍ॅप्लिकेशन लिंकवर जा

  • स्टेप्स 5: 'अधिकारी निवड - पात्रता' असलेले एक नवीन होम पेज ओपन होईल

  • स्टेप्स 6: शॉर्ट सर्व्हिस कमिशन एनसीसी कोर्सच्या विरूद्ध बाजूला असेलल्या अ‍ॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा

  • स्टेप्स 7: त्यात सर्व तपशील भरा आणि भारतीय सैन्य दलाचा एनसीसीचा अर्ज भरा

  • स्टेप्स 8: तपशील पुन्हा एकदा चेक करा आणि सबमिटवर क्लिक करा. आणि संदर्भासाठी त्याची एक प्रत डाउनलोड करा.

भारतीय सेना एनसीसी भरती 2021: निवड प्रक्रिया

पदवी आणि एनसीसी प्रमाणपत्रात मिळालेल्या गुणांच्या आधारे अर्जांची यादी लावली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना पुढे मुलाखत फेरीसाठी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण (Academy Training) 49 आठवड्यांसाठी चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी (OTA) येथे होणार आहे. ओटीएमध्ये संपूर्ण प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना 56,100 मासिक वेतन दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT