Army Bharti 2021: 8वी/10वी पास उमेदवारांसाठी बंपर भर्ती

जर तुम्हाला भारतीय सैन्यात (Indian Army) भरती करायचे असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
Recruitment in Indian Army
Recruitment in Indian ArmyDainik Gomantak

नवी दिल्ली: जर तुम्हाला भारतीय सैन्यात (Indian Army) भरती व्हायचं असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटवर जावून 20 जुलै 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स अधिकृत वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत. (Recruitment for 8th and 10th pass candidates in Indian Army)

प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार हा सैन्य भरती मेळावा अहमदाबादमध्ये आयोजित केला जाणार आहे. 05 ऑगस्ट 2021 ते 22 ऑगस्ट दरम्यान या भरतीचे आयोजन केले जाणार आहे. कनेलव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गोधरा, पंचमहल येथे रजिस्ट्रेशन करणाऱ्या उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे.

Recruitment in Indian Army
BSF Recruitment 2021: दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सुरक्षा दलात संधी

भरती संबंधीत पुर्ण तपशील

1. सोल्जर जनरल ड्यूटी (जीडी)

2. सोल्जर ट्रेड्समैन (ऑल आर्म्स) 8वीं पास

3. सोल्जर ट्रैड्समैन (ऑल आर्म्स) 10वीं पास

4. सोल्जर टेक्निकल

5. सोल्जर नर्सिंग असिस्टेंट

6. सोल्जर क्लर्क या स्टोर कीपर टेक्निकल किंवा इंवेंटरी मैनेजमेंट

वयोमर्यादा

सोल्जर जनरल ड्युटी पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांचे वय किमान साडे 17 वर्षे ते 21 वर्षे (1 ऑक्टोबर 2000 आणि 1 एप्रिल 2004 दरम्यान जन्म) असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अन्य पदांच्या उमेदवारांची वयोमर्यादा साडे 17 ते 23 वर्षां दरम्यान असणे आवश्यक आहे. (जन्म 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान).

शैक्षणिक पात्रताः

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे आठवी व दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. या संबधीत अधिक माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मिळवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com