short span bridging systems in Indian Army Dainik Gomantak
देश

Indian Army: 12 स्वदेशी ब्रिजिंग सिस्टम भारतीय सैन्यात दाखल

भारतीय लष्कराला (Indian Army) 12 देशी विकसित शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम (short span bridging systems) मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय लष्कराला (Indian Army) 12 देशी विकसित शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम (short span bridging systems) मिळाली आहे. म्हणजेच आता पाकिस्तानला लागणार्‍या पश्चिम सीमेवर कारवाईसाठी स्वदेशी पूल मिळाल्याने सैन्याला मोठा दिलासा मिळणार आहे. शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टम लहान नद्या आणि कालवे यासारख्या भौगोलिक अडचणींमध्ये सैन्याला सुविधा देईल. 10-10 मीटरच्या 12 ब्रिजिंग सिस्टम म्हणजे छोटे छोटे पुल पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर कार्यरत असतील. डीआरडीओ प्रमुख डॉ. जी सतीश रेड्डी आणि लष्कर प्रमुख एम.एम. नारावणे यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा सैन्याच्या ताब्यात देण्यात आली. (Indian Army inducts the 1st batch of 12 indigenously designed & developed Short Span Bridging systems)

पहिली 12 स्वदेशी ब्रिजिंग

कोर ऑफ इंजिनियर्स मध्ये 492 कोटी रूपयाची पहिली 12 स्वदेशी ब्रिजिंग प्रणाली विकसित केली आहे. सैन्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की शॉट ब्रिजिंग सिस्टमद्वारे कोणत्याही अडचणीवर मात करता येते. हे बिजिंग 70 टन वजन पाण्यातून वाहून नेण्यास सक्षम आहे. कॉर्पस ऑफ इंजिनिअर्सची ही यंत्रणा ब्रिजिंग क्षमतेला कितीतरी पटिने वाढविते.

“आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाकडे पाहण्याची ही पहिली आणि यशस्वी पायरी आहे. याला तयार करणाऱ्या सगळ्यांचे मी कौतुक करतो. सैन्यात ही सिस्टीम सामील झाल्याने अधिक सामर्थ्य वाढले आहे, असे लष्कर प्रमुख नरवणे म्हणाले.

डीआरडीओ आणि सैन्याच्या मदतीने ही यंत्रणा विकसित केली गेली आहे. सध्या त्याची चाचणी कोलारमध्ये सुरू आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सने यासाठी टेक्नोलॉजी ट्रांसफर केली आहे. त्यासाठी पुढील तयारी व विचार सुरू आहे, असे ही यंत्रणा सैन्यात सामिल झाल्यानंतर डीआरडीओ चीफ डॉ. जी सत्येश रेड्डी सांगत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT