Indian Army Viral Video Western Command Dainik Gomantak
देश

Operation Sindoor: तो सूड नव्हे न्याय होता... भारतीय सैन्याने पाकिस्तानी चौक्या केल्या उद्ध्वस्त, नवा Video आला समोर

Indian Army Viral Video Western Command: सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय सैन्याच्या वेस्टर्न कमांडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये, भारतीय सैन्याने जम्मू सेक्टरच्या समोरील पाकिस्तानमधील पाकिस्तानी चौक्या आणि टॉवर उद्ध्वस्त केले.

Manish Jadhav

'लाथों के भूत बातों से नहीं मानते...' ही म्हण पाकिस्तानच्या बाबतीत चपखल बसते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई करुन घेतला. त्यानंतर दोन्ही देशातील वाढता संघर्ष पाहता अमेरिकेने मध्यस्थी करत 10 मे रोजी युद्धबंदी घडवून आणली. मात्र युद्धबंदीनंतरही पाकड्यांच्या कुरापती सुरुच होत्या. 10 मे च्या संध्याकाळी पाकिस्ताने युद्धबंदीचे उल्लंघन करत सीमावर्ती भागात हल्ले केले. पाकड्यांच्या या हल्ल्यांनाही भारताने चोख प्रत्युत्तर दिले.

याचदरम्यान, सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीय सैन्याच्या वेस्टर्न कमांडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये, भारतीय सैन्याने जम्मू सेक्टरच्या समोरील पाकिस्तानमधील पाकिस्तानी चौक्या आणि टॉवर उद्ध्वस्त केले.

व्हिडिओमध्ये एक जवान म्हणताना दिसतोय की, 'हे सर्व पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून सुरु झाले. पाकिस्तानच्या (Pakistan) प्रत्येक कुरापतीचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल. पाकिस्तानला असे उत्तर दिले जाईल की त्यांच्या सात पिढ्या ते लक्षात ठेवतील. हा सूड नाही तर न्याय आहे. 9 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शत्रू सैन्याने युद्धबंदीचे उल्लंघन केले.'

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी गुजरातमधील भूज रुद्र माता हवाई दल तळाला भेट दिली. येथून त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्लाबोल केला. सिंह म्हणाले की, 'भारताचे ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. जेव्हा योग्य वेळ येईल भारतीय सेना संपूर्ण चित्रपट जगाला दाखवले.' सिंह पुढे म्हणाले की, भारत (India) पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही पाकिस्तानचे वर्तन सुधारेल की नाही हे पाहण्यासाठी त्याला प्रोबेशनवर ठेवले आहे.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय लष्कराचे पश्चिम कमांड कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक ठिकाणांना भेट दिली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT