Indian Army and Terrorists Encounter in J&K
Indian Army and Terrorists Encounter in J&K Twitter/ @ ANI
देश

Jammu and Kashmir मध्ये लष्कर अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु; माहिती मिळताच...

Manish Jadhav

Indian Army and Terrorists Encounter in J&K: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी सातत्याने वाढत आहे. हे दहशतवादी आधी देशाच्या सीमेत घुसतात आणि नंतर गुप्तपणे आपले नापाक इरादे आखतात.

मात्र, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांमुळे त्यांचे मनसुबे नेहमीच उधळले जातात. नुकतेच जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये दोन दहशतवादी लपल्याची बातमी समोर आली आहे.

2 दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे

दरम्यान, यासंबंधी माहिती मिळताच लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसराला वेढा घातला. यानंतर दहशतवादी (Terrorist) आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातील धरमसालच्या बाजीमल भागात लष्कर आणि दोन दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. मात्र, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

8 महिन्यांत 27 दहशतवादी मारले गेले

जम्मू-काश्मीर हा देशाचा असा भाग आहे, जिथे दहशतवादी अनेकदा रक्तपात, खून आणि हिंसाचार घडवून आणतात. ऑक्टोबरमधील एका अहवालानुसार, गेल्या 8 महिन्यांत जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करताना एकूण 27 दहशतवादी मारले गेले आहेत, ज्यांच्याकडून युद्धसामग्री आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नुकतेच जम्मू-काश्मीर सरकारने दहशतवादी कारवायांवर आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे.

दहशतवादी कारवायांवर कारवाई

अलीकडेच, जम्मू-काश्मीरमधील डॉक्टर, शिक्षक (Teacher) आणि कॉन्स्टेबलसह चार जणांवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चौघांनाही बरखास्त करण्यात आले आहे. पोलीस आणि तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT