Indian Air Force launch new Barmer Airstrip on National Highway in Jalore, Rajasthan Twitter @ ANI
देश

भारत-पाक सीमेवर वायुसेनेची आता करडी नजर,घुसखोरांना बसणार चाप

राजस्थानच्या (Rajasthan) जालोरमधील (Jalore) बाडमेर हायवेवर (Barmer Highway) गुरुवारी विशेष हवाई पट्टी (Airstrip) सुरू करण्यात आली आहे. (Barmer Airstrip)

Abhijeet Pote

राजस्थानच्या (Rajasthan) जालोरमधील (Jalore) बाडमेर हायवेवर (Badmer Highway) गुरुवारी विशेष हवाई पट्टी (Barmer Airstrip) सुरू करण्यात आली आहे . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत याचे लोकार्पण करण्यात आले आहे .विशेष बाब म्हणजे दोन्ही मंत्री देखील या हवाई पट्टीवर हवाई दलाच्या विशेष विमानाने आले होते. (Indian Air Force launch new Barmer Airstrip on National Highway in Jalore, Rajasthan)

विशेष म्हणजे ही हवाई पट्टी पाकिस्तानच्या सीमेपासून काही अंतरावर आहे,भारत पाक सीमेपासून हवाई पट्टी सुमारे 4 किमी आहे. यावर हवाई दलाचे लढाऊ विमान लांब पट्ट्यांवर उतरू शकतील. सुखोई लढाऊ विमान तसेच जग्वार आणि हवाई दलाची इतर विमानेही येथे दिसतील.

विशेष गोष्ट अशी आहे की ही हवाई पट्टी भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे, त्यामुळे भविष्यातही रणनीतिकदृष्ट्या याला खूप महत्त्व असेल. या प्रकारच्या हवाई पट्टीच्या महामार्गावर अनेक महत्त्वाच्या भूमिका आहेत, सुमारे चार विमाने उभी करण्याची सोय देखील या हवाईपट्टीवर असणार आहे. हवाई दल गेल्या काही काळापासून देशाच्या विविध भागात राष्ट्रीय महामार्गावर अशा हवाई पट्ट्या बनवण्यावर सातत्याने भर देत आहे. हा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे, जिथे अशी हवाई पट्टी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी सुखोई उत्तर प्रदेशच्या आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवरही उतरले आहे.

त्याचबरोबर आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी राजस्थानमधील बाडमेरजवळ NH-925A वर आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन देखील करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT