BRICS Summit: मोदींच्या अध्यक्षतेखाली पाच देशांची बैठक, अफगाणिस्तानवर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या समूहाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत . भारत यावर्षी ब्रिक्सच परिषदेचा अध्यक्ष (BRICS Summit President) आहे.
Prime Minister Narendra Modi will address to the BRICS Summit
Prime Minister Narendra Modi will address to the BRICS SummitDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज ऑनलाईन पद्धतीने ब्रिक्स परिषदेला(BRICS Summit) संबोधित लकरणार आहेत. ते ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या समूहाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत . भारत यावर्षी ब्रिक्सच परिषदेचा अध्यक्ष (BRICS Summit President) आहे. या बैठकीला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा उपस्थित आदी नेते उपस्थीत असणार आहेत. या बैठकीत अफगाणिस्तानमधील (Afghanistan Crisis) सद्यस्थितीवर चर्चा अपेक्षित आहे. (Prime Minister Narendra Modi will address to the BRICS Summit)

या बैठकीसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग परिषदेला उपस्थित राहतील. यावेळी शिखर परिषदेची थीम "ब्रिक्स@15: आंतर-ब्रिक्स स्थिरता, एकता आणि सहमतीसाठी सहकार्य"अशी असणार आहे.

Prime Minister Narendra Modi will address to the BRICS Summit
Assam Accident: ब्रह्मपुत्रा नदीवर जहाजांचा मोठा अपघात; अनेक लोक बेपत्ता

पीएमओने (PMO) याबाबतीत म्हटले आहे की, मोदींच्या अध्यक्षतेखाली भारताने चार प्राधान्य क्षेत्रांसाठी ब्लूप्रिंट तयार केली आहे. या चार क्षेत्रांमध्ये बहुस्तरीय प्रणाली, दहशतवादविरोधी, शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजिटल आणि तांत्रिक उपायांचा अवलंब करणे आणि लोकांमध्ये संवाद वाढवणे यांचा समावेश असणार आहे. भारताने यात चार प्राधान्य क्षेत्रांवर भर दिला आहे, ज्यात बहुपक्षीय प्रणालीमध्ये सुधारणा करणे, दहशतवादविरोधी उपाययोजना, शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजिटल आणि तांत्रिक साधनांचा वापर करणे आणि लोकांमध्ये संवाद वाढवणे समाविष्ट आहे. यासह,हे सारे नेते कोविड -१९ साथीच्या प्रभावावर आणि इतर जागतिक आणि प्रादेशिक समस्यांवर मते मांडणार आहेत.

तप्रधान मोदी दुसऱ्यांदा ब्रिक्स परिषदेचे अध्यक्ष होतील. यापूर्वी, 2016 मध्ये त्यांनी गोवा शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. ब्रिक्सचे 15 वे स्थापना वर्ष साजरे होत असताना या वर्षी भारत ब्रिक्सचा अध्यक्ष आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com