Shefali Verma Dainik Gomantak
देश

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

India Women A vs Australia Women A: भारताला ऑस्ट्रेलिया महिला 'अ' संघाकडून 4 धावांनी निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी क्लीन स्वीप केली.

Manish Jadhav

India Women A vs Australia Women A: भारतीय महिला 'अ' संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलिया महिला 'अ' संघाकडून 4 धावांनी निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी क्लीन स्वीप केली.

ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात

मॅकॉयच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) महिला 'अ' संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी मॅडलिन पेन्ना हिने सर्वाधिक 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. तिला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यासाठी भारताकडून गोलंदाजीमध्ये प्रेमा रावत आणि कर्णधार राधा यादव यांनी मोलाची भूमिका बजावली. या दोघींनी प्रत्येकी 3-3 बळी घेत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. सजीवन सजनानेही एक बळी घेतला. दुसरीकडे, प्रेमा रावतसाठी ही मालिका चांगली गेली, तिने तीन सामन्यांत एकूण 7 बळी घेतले.

भारताच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला 'अ' संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. 16 धावांच्या आतच दिनेश वृंदा आणि उमा छेत्री या दोघीही तंबूत परतल्या होत्या. मात्र, यानंतर सुरुवातीच्या दोन सामन्यांत फारशी चांगली कामगिरी न केलेली शेफाली वर्मा (Shefali Verma) हिने आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला. राघवी बिष्टसोबत तिने तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. शेफालीने 25 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 41 धावांची धडाकेबाज खेळी खेळली.

6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही

शेफाली बाद झाल्यानंतर राघवी बिष्टने 25 धावांची आणि मिनू मानीने 30 धावांची खेळी खेळली. मात्र, या दोघीही संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. भारतीय संघाची सर्वात मोठी निराशाजनक बाब म्हणजे, या सामन्यात 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे अखेरीस भारताला 20 षटकांत 8 गडी गमावून 140 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि 4 धावांनी पराभव पत्करावा लागला.

ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजीमध्ये सियाना जिंजर हिने सर्वात प्रभावी कामगिरी करत 4 बळी घेतले. एमी एडगर आणि लुसी हॅमिल्टन यांनीही प्रत्येकी 1-1 बळी मिळवून विजयात योगदान दिले. या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला 'अ' संघाने मालिका 3-0 अशी जिंकत भारतीय संघाला क्लीन स्वीप दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT