
इंग्लंड दौऱ्यावरही भारतीय अंडर-१९ संघाने चांगली कामगिरी केली. जिथे एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या बहुतेक खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी स्थान मिळाले आहे. आयुष म्हात्रेला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे आणि विहान मल्होत्राला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. करिष्माई सलामीवीर वैभव सूर्यवंशीसह अनेक प्रमुख खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे.
कर्णधारपदी विराजमान झालेला आयुष महात्रे आयपीएल २०२५ मध्ये आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे आणि त्याने आयपीएल २०२५ च्या ७ सामन्यांमध्ये एकूण २४० धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक निघाले. ऑस्ट्रेलिया दौरा २१ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि १० ऑक्टोबर रोजी संपेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी बुधवारी एका निवेदनात सांगितले की, ज्युनियर निवड समितीने सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या अंडर-१९ संघाची निवड केली आहे.
भारतीय १९ वर्षांखालील संघाने इंग्लंड दौऱ्यावर युवा एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली, तर दोन युवा कसोटी सामने अनिर्णित राहिले. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली. यामध्ये वैभव सूर्यवंशी, आयुष महात्रे आणि विहान महोत्रा यांचा समावेश होता. सूर्यवंशी आणि विहान यांच्या शतकांमुळे भारताने वॉर्सेस्टरमध्ये चौथा सामना जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३६३ धावांचा मोठा स्कोअर केला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेतील सामने २१, २४ आणि २६ सप्टेंबर रोजी खेळले जातील. बहुदिवसीय सामने ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर आणि ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान होतील. ज्युनियर निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाच स्टँडबाय खेळाडूंचीही निवड केली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघ:
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंग, आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल पटेल, डी दिपेश, किशन कुमार, अनमोलजीत सिंग, खिलन पटेल, उद्धव मोहन आणि उद्धव मोहन.
स्टँडबाय खेळाडू: युधजीत गुहा, लक्ष्मण, बीके किशोर, अलंकृत रापोल आणि अर्णव बग्गा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.