Team india Dainik Gomantak
देश

IND vs SA Test: एकाचं त्रिशतक, तर 3 खेळाडूंची द्विशतकं...भारतीय फलंदाजांचा दबदबा; कसोटी मालिकेपूर्वी आफ्रिकेचे गोलंदाज टेन्शनमध्ये

Test Series Records: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पुन्हा एकदा कसोटी मालिका सुरु होत आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळला जाईल.

Manish Jadhav

Test Series Records: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पुन्हा एकदा कसोटी मालिका सुरु होत आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळला जाईल. यावेळी अनेक नवीन विक्रम स्थापित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्या भारतीय फलंदाजांनी द्विशतक आणि त्रिशतक ठोकले आहे, यावर एक नजर टाकूया. विशेष म्हणजे, एका भारतीय खेळाडूने तर त्रिशतक ठोकून इतिहास रचला आहे.

वीरेंद्र सेहवागचे एकमेव 'त्रिशतक'

जेव्हा जेव्हा भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये आमनेसामने आला, तेव्हा फक्त एकदाच त्रिशतक आले. हे काम भारताचा विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने केले. सेहवागने 2008 मध्ये चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 धावांची धमाकेदार खेळी खेळली होती. सेहवागची ही तूफानी खेळी चाहत्यांच्या अजूनही लक्षात आहे. यानंतर दोन्ही संघांमधील कसोटी सामन्यात दुसरे कोणतेही त्रिशतक आलेले नाही.

द्विशतक ठोकणारे तीन भारतीय फलंदाज

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तीन दिग्गज फलंदाजांची नावे येतात. अनुक्रमे विराट कोहली, रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल. या तिन्ही फलंदाजांनी 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत द्विशतके झळकावली होती. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2019 मध्ये पुणे येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 254 धावांची विक्रमी खेळी खेळली होती. सलामीवीर मयंक अग्रवालनेही 2019 मध्येच विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 215 धावांची खेळी खेळली होती. तर भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने यानेही 2019 मध्येच रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 212 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.

या मालिकेत द्विशतकाची शक्यता

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा कोणता भारतीय फलंदाज द्विशतक झळकावतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील. ही मालिका भारतात खेळली जात असल्याने, भारतीय फलंदाजांसाठी 200 धावांचा टप्पा पार करण्याची शक्यता जास्त आहे. खेळपट्टी कशी असेल, हे सामन्याच्या दिवशी सकाळीच स्पष्ट होईल. परंतु, भारतीय फलंदाज आणि गोलंदाज जबरदस्त कामगिरी करुन ही कसोटी मालिका भारताच्या नावावर करतील, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Car Blast: दिल्ली कार स्फोट प्रकरण; 'क्रिकेट टीम' थोडक्यात बचावली, बस 40 मिनिटे आधी निघाल्याने टळला मोठा अनर्थ!

VIDEO: "एरिका कुठेय?" भर समारंभात बोलावून डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं Kiss, ओव्हल ऑफिसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Horoscope: 12 नोव्हेंबरला मोठा बदल! चंद्र-केतू सिंह राशीत युती; 'या' 3 राशींच्या करिअर आणि कुटुंबात वाढणार अडचणी

'विवाह नोंदणी' आता कोणत्याही तालुक्यातून शक्य! CM सावंतांची मोठी घोषणा, 8 ते 10 दिवसांत सुविधा सुरू होणार

Transgender Ban: ऑलिम्पिकमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना बंदी? पॅरिस स्पर्धेतील वादानंतर IOC लवकरच घेणार मोठा निर्णय; लागू होणार नवा नियम

SCROLL FOR NEXT