Prasidh Krishna Vs Joe Root: भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर (Kennington Oval Ground) सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) शेवटच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी मैदानावर काहीसा तणाव पाहायला मिळाला. भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट (Joe Root) यांच्यात जोरदार बाचाबाची झाली, ज्यामुळे पंचांना (Umpires) हस्तक्षेप करावा लागला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 224 धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली, पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी काही चांगली षटके टाकली. जेव्हा इंग्लंडला दुसरा धक्का 129 धावांवर बसला, तेव्हा मैदानात उतरलेला जो रुट सुरुवातीला थोडा अस्वस्थ (Uncomfortable) दिसत होता. याचवेळी प्रसिद्ध कृष्णाने त्याला काही चांगले चेंडू टाकले.
इंग्लंडच्या पहिल्या डावात 22व्या षटकात प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीसाठी आला. त्याच्या या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर जो रुट (Joe Root) एकही धाव घेऊ शकला नाही. यादरम्यान, प्रसिद्धने रुटला काहीतरी म्हटले, ज्यामुळे रुट खूप चिडला. रुटने या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जोरदार फटका मारला आणि चेंडू सीमारेषेबाहेर गेला. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला.
दोन्ही खेळाडूंमधील वाद वाढत असल्याचे पाहून मैदानावरील पंचांनी (Field Umpires) दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. पंच कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena) यांनी प्रसिद्ध कृष्णाला बाजूला घेऊन त्याच्याशी आणि भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलशी (Shubman Gill) देखील चर्चा केली.
ओव्हलच्या खेळपट्टीवर (Pitch) फलंदाजी करणे सोपे नाही, पण रुटने चांगला जम बसवला होता. मात्र, मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) एका आत येणाऱ्या चेंडूवर तो चुकला आणि पंचांनी त्याला पायचीत (LBW) बाद दिले. रुटने 45 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या, ज्यात 6 चौकारांचा समावेश होता. अशा प्रकारे, रुटची खेळी संपुष्टात आणण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. या घटनेमुळे सामन्यात थोडा तणाव निर्माण झाला असला, तरी दोन्ही संघांतील खेळाडू आणि पंचांनी परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.