भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा सामना सुरु आहे. हा सामना सिडनी येथे सुरु आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 236 धावा बनवल्या होत्या. भारताने हे लक्ष्य 38.3 ओव्हरमध्ये पार केले. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी धुंवाधार फलंदाजी केली.
तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकले होते. त्यामुळे तिसऱ्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया फार मोठा स्कोर बनवू शकली नाही. रेनशॉच्या अर्धशतकीय खेळीमुळे ऑस्ट्रेलिया सव्वादोनशेचा टप्पा पार करू शकली.
भारताकडून हर्षित राणाने 39 धावा देत चार विकेट्स घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरने 44 धावा देत दोन विकेट पटकावल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव 46.2 षटकात आटोपला.
भारताने आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्माने सुरुवातीपासून फटके खेळायला सुरुवात केली. शुभमन गिल दुसऱ्या बाजूने साथ देत होता. ही जोडी जमत आहे असे वाटताना कर्णधार गिल संघाच्या 69 धावांवर विकेटकिपरकडे झेल देऊन बाद झाला. यांनतर विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी जमली.
रोहित शर्माने झंझावाती खेळी करत शतक पूर्ण केले. यात त्याने दोन षटकारही लगावले. त्याला सुरेख साथ देत कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित शर्मा 121 धावा करून नाबाद राहिला तर विराटने 74 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.