Indian Youth Dainik Gomantak
देश

Russia-Ukraine War: नोकरीच्या आमिषाने फसवणूक केलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकार आक्रमक; त्यांच्या सुटकेसाठी...

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालले आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी रशियामध्ये भारतीयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले होते.

Manish Jadhav

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालले आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी रशियामध्ये भारतीयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर यासंबंधीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यातच आता, या प्रकरणावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया समोर आली आहे. रशियन सैन्याने युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासाठी भारतीय नागरिकांना भाग पाडल्याचा मुद्दा भारत सरकारने आक्रमकपणे मॉस्कोसमोर मांडला आहे, असे MEA च्या प्रवक्त्याने आज पत्रकार परिषदेत सांगितले.

MEA च्या प्रवक्त्याने सांगितले की, भारत सरकार रशियन सैन्यात सहाय्यक कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितरित्या मायदेशात घेऊन येण्यासाठी कटीबद्ध आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे हे वक्तव्य अशा वेळी आले जेव्हा सीबीआयने देशातील 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये मानवी तस्करीच्या संबंधी छापेमारी केली. भारतीय तरुणांना फसवून रशियाला घेवून जाण्याच्या टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केला.

तपास यंत्रणेने सांगितले की, आतापर्यंत 35 जणांना नोकरीच्या बहाण्याने रशिया आणि युक्रेनमध्ये पाठवले असल्याचे तपासात समोर आले आहे. या रॅकेटची मोडस ऑपरेंडी उघड करताना सीबीआयने सांगितले की, या टोळीतील लोक निरपराध देशातील तरुणांना परदेशात आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना लक्ष्य करायचे. हे तस्कर एक संघटित नेटवर्क म्हणून काम करत होते. विशेष म्हणजे, ते सोशल मीडिया चॅनेलद्वारे आणि त्यांच्या स्थानिक एजंटद्वारे भारतीय नागरिकांना रशियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत होते. दरम्यान, याप्रकरणी सीबीआय दिल्ली, तिरुअनंतपुरम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई येथे जवळपास 13 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली.

दुसरीकडे, खाजगी व्हिसा कंसल्टन्सी कंपन्या, एजंट आणि इतरांविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती सीबीआयने दिली. उत्तम रोजगार आणि मोठ्या पगाराच्या नोकरीच्या नावाखाली ते भारतीय नागरिकांची तस्करी करत असल्याचे आढळून आले. छापेमारीदरम्यान सीबीआयकडून 50 लाख रुपये कॅश, संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रिक रेकॉर्ड, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अनेक डेस्कटॉप जप्त करण्यात आले. यासोबतच सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, या युद्धात हैदराबादमधील एका तरुणाचा मृत्यी झाल्याची पुष्टी झाली. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. नोकरीच्या नावाखाली एजंटने 30 वर्षीय तरुणाची फसवणूक करुन रशियन सैन्यात भरती केल्याचा आरोप आहे.

"आम्हाला भारतीय नागरिक मोहम्मद अफसान याच्या दुःखद मृत्यूबद्दल कळले. आम्ही त्याचे कुटुंबीय आणि रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. लवकरच त्याचे पार्थिव भारतात पाठवण्यात येईल," असे मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने एका पोस्टमध्ये म्हटले. अफसानचा भाऊ इम्रान याच्याशी संपर्क साधला असता, मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने 30 वर्षीय अफसानच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना दिली.

अफसानचा भाऊ इम्रानच्या म्हणण्यानुसार, ''अफसान आणि इतर दोघे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रशियाला गेले होते. त्यांना एजंटनी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने पुढे सांगितले की, कुटुंबाने अफसानशी शेवटचा संपर्क 31 डिसेंबर 2023 रोजी साधला होता.'' अफसान रशियाला जाण्याच्या पूर्वी हैदराबादमध्ये एका कपड्याच्या शोरुममध्ये काम करत होता, असेही त्याच्या भावाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT