Attari-Wagah Border Dainik Gomantak
देश

Republic Day 2024: भारत- पाकिस्तान आमने सामने; अटारी सीमेवर 'बीटिंग द रिट्रीट'चा थरार, पाहा व्हिडिओ

Republic Day 2024:अटारी सीमेवर जवानांचे शौर्य पाहून लोकांचाही उत्साह वाढला. पर्यटकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम, हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

Ganeshprasad Gogate

Republic Day 2024: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली.

26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून 'प्रजासत्ताक दिन' (Republic Day) साजरा केला जातो. आज दिल्लीसह देशभरात या सोहळ्याचा उत्साह पहायला मिळाला.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी अटारी सीमेवर आयोजित बीटिंग द रिट्रीट सोहळ्यात बीएसएफ जवान मोठ्या उत्साहात सामील झालेले दिसले.

हजारो पर्यटकांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी हिंदुस्थान जिंदाबाद आणि भारत माता की जयच्या घोषणा देत बीएसएफच्या शूर जवानांना प्रोत्साहन दिले.

प्रजासत्ताक दिनापूर्वी पंजाबमधील अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट सोहळ्यादरम्यान सीमेवर देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.

अटारी सीमेवर जवानांचे शौर्य पाहून लोकांचाही उत्साह वाढला. पर्यटकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम, हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

दरम्यान, वृत्तसंस्था ANI ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या कार्यक्रमाची झलक दिसून आली. विशेष म्हणजे, उपस्थित देशभक्त नागरिकांनी मोठ्या उत्साहात भारतीय जनावांचे मनोबल उंचावणाऱ्या घोषण्या दिल्या.

व्हिडिओमध्येही भारतीय लष्कराचे अधिकारी जोष वाढवताना दिसत आहेत. 17 व्या शतकातील लष्करी समारंभाला ऐतिहासिक महत्त्व आहे.

दुसरीकडे, यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची परेड ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार ठरली, यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 100 हून अधिक महिला कलाकारांनी दिल्लीतील परेडचे नेतृत्व केले. तर अनेक सर्व महिला दलांनी अभिमानाने 'नारी शक्ती'चे सामर्थ्य दाखवत कर्तव्य पथावरुन कूच केले.

'बीटिंग द रिट्रीट' म्हणजे काय?

‘बीटिंग द रिट्रीट’ची (Beating Retreat) परंपरा शतकानुशतके जुनी आहे. 17 व्या शतकात इंग्लंडमध्ये याची सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. 1950 मध्ये भारतात प्रथमच बीटिंग रिट्रीट सेरेमनी (Beating Retreat Ceremony) आयोजित करण्यात आली होती. बीटिंग रिट्रीट हा सैन्यदलाशी संबंधित एक उत्सवी कार्यक्रम आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या सांगतेनिमित बीटिंग रिट्रीट हा कार्यक्रम सादर केला जाते. 29 जानेवारीला संध्याकाळी ‘बीटिंग द रिट्रीट’ (Beating The Retreat) कार्यक्रम आयोजित केला जातो.

दिल्लीतील रायसीना रोडवरील राष्ट्रपती भवनासमोर ते प्रदर्शित करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाप्रमाणे हा कार्यक्रमही पाहण्यासारखा आहे. यासाठी राष्ट्रपती भवन, विजय चौक, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक अतिशय सुंदर रोषणाईने सजवण्यात येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT