India Pakistan Tension  Dainik Gomantak
देश

India Pakistan Tension: युद्ध उंबरठ्यावर! पाकिस्तानच्या नापाक कारवाईत 16 भारतीय ठार, 15 लष्करी तळांवरील हल्ला भारताने हाणून पाडला

India Pakistan War Tension 2025: बुधवारी (7 मे) रात्री पाकिस्तानने पठाणकोटसह 15 लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय लष्कराने हाणून पाडला. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने हवेतच पाकिस्तानी क्षेपणास्त्रे निष्क्रिय केली.

Manish Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान बिथरला आहे. बुधवारी (7 मे) रात्री पाकिस्तानने पठाणकोटसह 15 लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो भारतीय लष्कराने हाणून पाडला. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने हवेतच पाकिस्तानी क्षेपणास्त्रे निष्क्रिय केली. यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानातील लाहोरमध्ये ड्रोनद्वारे हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान एअर डिफेन्सच्या HQ-9 एअर डिफेन्स मिसाईल लाँचर्संचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, नियंत्रण रेषेवर पाकिस्तान (Pakistan) भारतातील सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गावांमध्ये गोळीबार आणि तोफगोळे डागले, ज्यामुळे कुपवाडा आणि पूंछमधील कर्नाह येथे राहणारे नागरिक ठार झाले. यामध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मते, 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 57 जण जखमी झाले. पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नाहीये, तरीही भारतीय सैन्य पूर्ण तयारीने प्रत्युत्तर देत आहे.

7-8 मे च्या पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी इमारतींवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. मात्र पाकिस्तानचे हे हल्ले काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींनी निष्प्रभ केले.

पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने गुरुवारी (8 मे) सकाळी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना टार्गेट केले. भारताने पाकिस्तानसोबत 'टॅट टू टॅट' धोरण स्वीकारले असून पाकिस्तान जेवढ्या तीव्रतेने हल्ला करतो तेवढ्याच तीव्रतेने भारतही प्रत्युत्तर देत आहे. लष्कराच्या या हल्ल्यात लाहोरमधील (Lahore) एक हवाई संरक्षण यंत्रणाही उद्ध्वस्त झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने मोर्टार आणि तोफखान्यांचा वापर करुन गोळीबाराची तीव्रता वाढवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT