India Sends Humanitarian Aid To Palestine Dainik Gomantak
देश

मोदी सरकारचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात, वैद्यकीय आणि आपत्ती निवारण साहित्यासह IAF C-17 विमान रवाना

India Sends Humanitarian Aid To Palestine: या साहित्यांमध्ये जीवन रक्षक औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, झोपण्यासाठी तंबू, पिशव्या, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्तता आणि इतर आवश्यक वस्तूंसह पाणी शुद्धीकरण गोळ्यांचा समावेश आहे.

Ashutosh Masgaunde

India has sent nearly 40 tonnes of humanitarian aid for war-affected civilians in Palestine:

भारताने पॅलेस्टाईनमधील युद्ध पीडित नागरिकांसाठी जवळपास 40 टन मानवतावादी मदत पाठवली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) रविवारी सांगितले.

एका ट्विटमध्ये, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन IAF C-17 विमान इजिप्तमधील अल-अरिश विमानतळावर रवाना झाले.

"या साहित्यांमध्ये जीवन रक्षक औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, झोपण्यासाठी तंबू, पिशव्या, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्तता आणि इतर आवश्यक वस्तूंसह पाणी शुद्धीकरण गोळ्यांचा समावेश आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी नुकताच दूरध्वनीवरून संवाद साधला. तसेच भारत पॅलेस्टिनी लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहील, असे आश्वासनही दिले.

गाझामधील अल अहली हॉस्पिटलमध्ये एका रॉकेट हल्ल्यामुळे मारल्या गेलेल्या नागरिकांच्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला.

भारत आणि या प्रदेशातील पारंपारिकपणे जवळचे आणि ऐतिहासिक संबंध अधोरेखित करत पंतप्रधानांनी दहशतवाद, हिंसाचार आणि या भागातील ढासळत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

“इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर त्यांनी भारताच्या दीर्घकालीन आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पुनरुच्चार केला,” असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि भारताच्या भूमिकेचे कौतुक केले.

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या भोवऱ्यात पॅलेस्टाईनचे लोक अडकले आहेत. इस्रायलने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची शपथ घेतली आहे.

शनिवारी, मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या तब्बल 20 ट्रकना अखेर इजिप्तच्या रफाह सीमेवरून गाझा पट्टीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.

तथापि, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, 2 दशलक्षाहून अधिक लोक असलेल्या एन्क्लेव्हमध्ये मदतीची आवश्यकता खूप जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drugs In Goa: कैद्यांना जर ड्रग्स मिळत असतील, तर बिट्स पिलानी ‘किस झाड की पत्ती’! गोव्याच्या मानगुटीवर बसलेले भूत

आत्महत्या की हत्या? 24 तास बेपत्ता, झुआरी पुलाजवळ आढळलेला मृतदेह, असोल्डातील व्यक्तीच्या मृत्यूने वाढले गूढ

Valpoi: वाळपईत 4 वर्षांत दगावली 154 गुरे! वाढती प्लास्टिक समस्या चिंताजनक; 12 महिन्यांची वासरेही बाधीत

'कुंपणंच खातंय शेत', केस मिटवण्यासाठी पोलिसाने घेतली लाच; वाळपईत हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई

Rajmata Jijabai Karandak: गोव्याने गुजरातला हरवले! करिष्माचा मौल्यवान गोल; मुख्य फेरीतील जागा पक्की

SCROLL FOR NEXT