Global Hunger Index 2023: ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताची स्थिती बिकट झाली आहे. 125 देशांच्या या निर्देशांकात भारत 111 व्या स्थानावर आला आहे.
इतकेच नाही तर सर्वाधिक बाल कुपोषणदेखील भारतातच दिसून येत असून त्याचे प्रमाण १८.७ टक्के आहे. 2022 च्या म्हणजेच गतवर्षी भारत या निर्देशांकात 107 व्या क्रमांकावर होता.
गुरूवारी जाहीर झालेल्या या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा स्कोअर 28.7 टक्के आहे. त्यावरून भारतात भूक आणि उपासमारीची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते.
ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) हे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूकेचे सर्वसमावेशक मोजमाप आणि मागोवा घेण्यासाठीचे एक साधन आहे.
विशेष म्हणजे, या निर्देशांकात शेजारील पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ हे देशदेखील भारताच्या पुढे आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये पाकिस्तान 102 व्या, बांगलादेश 81 व्या, नेपाळ 69 व्या आणि श्रीलंका 60 व्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने ग्लोबल हंगर इंडेक्स नाकारला होता
केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने गेल्या वर्षी आणि त्याआधीच्या वर्षी म्हणजे सलग 2 वर्षे हा ग्लोबल हंगर इंडेक्स अहवाल पूर्णपणे नाकारला होता. मंत्रालयाने म्हटले होते की जागतिक भूक मोजण्यासाठी केवळ मुलांवर लक्ष केंद्रित केलेल्या मेट्रिक्सचा वापर केला जाऊ नये.
मंत्रालयाने याला भूक मोजण्याचा चुकीचा मार्ग म्हटले होते. GHI 2022 बद्दल, मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, भूक मोजण्यासाठी वापरल्या जाणार्या 4 पद्धतींपैकी 3 फक्त मुलांच्या आरोग्यावर आधारित आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.