Bird Flu Vaccine Dainik Gomantak
देश

Bird Flu Vaccine: बर्ड फ्लूविरुद्ध भारताने बनवली स्वदेशी लस; 20 नोव्हेंबरला होणार लाँच

India First Indigenous h5n1 Bird Flu Vaccine: भारताने पोल्ट्री क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनलेल्या एच5एन1 एव्हियन इन्फ्लुएंझा म्हणजेच ‘बर्ड फ्लू’च्या विरोधात लढण्यासाठी देशातील पहिली स्वदेशी लस तयार केली.

Manish Jadhav

India First Indigenous h5n1 Bird Flu Vaccine: भारताने पोल्ट्री क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनलेल्या एच5एन1 एव्हियन इन्फ्लुएंझा म्हणजेच ‘बर्ड फ्लू’च्या विरोधात लढण्यासाठी पहिली स्वदेशी लस तयार केली. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आणि पोल्ट्री उद्योगाची तयारी अधिक मजबूत करण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते भोपाळ येथे ही बहुप्रतिक्षित लस राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे.

भोपाळ येथील प्रसिद्ध ‘आयसीएआर– नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी एनिमल डिसीज’ या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ही लस विकसित केली. देशातील विविध भागांमध्ये वारंवार पसरणाऱ्या बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा मृत्यू होतो, ज्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे अतोनात आर्थिक नुकसान होते आणि स्थानिक पुरवठा साखळीतही मोठा अडथळा निर्माण होतो. या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी अनेकदा बाधित पक्ष्यांना नष्ट करावे लागते, ज्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनतो.

शासकीय आकडेवारीनुसार, बर्ड फ्लूच्या तीव्र प्रादुर्भावामुळे देशाच्या जीडीपीवर 1.5 टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो, तर वेळेवर योग्य प्रतिबंध न केल्यास देशातील सुमारे 20 टक्के पोल्ट्री क्षेत्र धोक्यात येऊ शकते. याआधी 2006 मध्ये बर्ड फ्लूच्या उद्रेकामुळे देशाला थेट आणि अप्रत्यक्ष मिळून तब्बल दोन ते तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसला होता.

हेच लक्षात घेऊन आयसीएआर-निसादने विकसित केलेली ही नवीन एच5एन1 लस विशेषतः ‘क्लॅड 2.3.4.1अ’ या स्ट्रेनला लक्ष करते, ज्यामुळे देशात पसरणाऱ्या विषाणूचा मुकाबला करण्याची क्षमता कैक पटीने वाढणार आहे. बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबडीच्या सेवनाने हा जीवघेणा आजार मानवामध्येही पसरण्याचा धोका असतो, त्यामुळे केवळ पक्ष्यांचे प्राण वाचवण्यासाठीच नव्हे, तर मानवी आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देखील ही लस अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quad Summit 2026: 'क्वाड' हिंद-प्रशांतचा विश्वासार्ह भागीदार; मोदींचा सागरी सुरक्षा, तंत्रज्ञान अन् सहकार्यावर भर

ICC ODI Rankings: वनडे रँकिंगमध्ये मोठा फेरबदल! शुभमन गिल आणि विराट कोहलीची बादशाहत कायम, रोहित-श्रेयसला झटका

Kendra Drishti Yog 2026: भाग्य उजळणार संयोग! सूर्य-गुरुच्या केंद्र दृष्टीने 5 राशींना मिळणार अफाट संपत्ती; आर्थिक लाभाची पर्वणी

IPL Auction Date: BCCI कडून IPL 2027 ऑक्शनची तारीख जाहीर, 16 डिसेंबरला गोव्यात खेळाडूंवर लागणार कोटींची बोली; पैशांचा पडणार पाऊस

Goa Fire Services Sports Festival: अग्निशमन जवान मैदानात उतरणार! पणजीत 14 व्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन; चार दिवस विविध स्पर्धांचा थरार

SCROLL FOR NEXT