Bird Flu: धास्ती...! बर्ड फ्लू विषाणूत होतयं म्यूटेशन; जाणून घ्या किती धोकादायक?

Manish Jadhav

बर्ड फ्लू

बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लूएंझा हा पक्ष्यांमुळे होणारा धोकादायक आजार आहे, परंतु आता हा विषाणू केवळ पक्ष्यांनाच नाही तर मानव आणि प्राण्यांनाही संक्रमित करत आहे.

Bird Flu | Dainik Gomantak

धोका

त्यामुळे जगभरात बर्ड फ्लूचा धोका पुन्हा एकदा वाढत आहे. अमेरिकेत या विषाणूमुळे 20 मांजरींचाही मृत्यू झाला आहे. पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये विषाणू पसरल्यामुळे हे घडले आहे.

Bird Flu | Dainik Gomantak

लागण

अलीकडेच, अमेरिकेतही एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले. त्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याच्या अहवालावरुन त्याच्यामध्ये असलेल्या बर्ड फ्लूच्या विषाणूमध्ये म्यूटेशन झाल्याचे समोर आले.

Bird Flu | Dainik Gomantak

अहवाल

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सांगितले की, गेल्या आठवड्यात देशातील बर्ड फ्लूच्या पहिल्या गंभीर प्रकरणाच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्याच्या विश्लेषणातून असे म्यूटेशन समोर आले आहे, जे यापूर्वी कोणत्याही संक्रमित व्यक्तीमध्ये दिसले नव्हते.

Bird Flu | Dainik Gomantak

म्यूटेशन

जेव्हा जेव्हा व्हायरस स्वतःमध्ये बदल घडवतो तेव्हा त्याला म्यूटेशन म्हणतात. व्हायरस स्वतःला मजबूत बनवण्यासाठी म्यूटेशन करतो.

Bird Flu | Dainik Gomantak

पहिला रुग्ण

गेल्या आठवड्यात अमेरिकेत विषाणूचा पहिला गंभीर रुग्ण आढळला होता. लुईझियानामध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला.

Bird Flu | Dainik Gomantak
आणखी बघा