Bird Flu Spread In Human: बर्ड फ्लू माणसांमध्ये सहज पसरु शकतो... WHO ने दिला हा मोठा इशारा

Bird Flu: बर्ड फ्लू बहुतेक लोकांना एव्हियन इन्फ्लूएंझा किंवा एव्हियन फ्लू या नावाने माहित आहे. हा विषाणू माणसालाही सहज संक्रमित करु शकतो.
Bird Flu Spread In Human
Bird Flu Spread In HumanDainik Gomantak
Published on
Updated on

Bird Flu Spread In Human: बर्ड फ्लू हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे, जो विशेषतः पक्ष्यांमध्ये आढळतो. हा रोग सामान्यतः पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या इन्फ्लूएंझा H5N1 विषाणूमुळे होतो.

बर्ड फ्लू बहुतेक लोकांना एव्हियन इन्फ्लूएंझा किंवा एव्हियन फ्लू या नावाने माहित आहे. हा विषाणू माणसालाही सहज संक्रमित करु शकतो. बर्ड फ्लू माणसांमध्ये सहज पसरु शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकताच दिला आहे.

डब्ल्यूएचओच्या वतीने असे सांगण्यात आले की, एव्हीयन इन्फ्लूएंझा म्हणजेच बर्ड फ्लूचा (Bird Flu) विषाणू सामान्यतः पक्ष्यांमध्ये पसरतो, परंतु सस्तन प्राण्यांमध्ये त्याची वाढती प्रकरणे चिंतेचे कारण बनत आहेत. अशा परिस्थितीत, हा विषाणू सहजपणे मानवांना संक्रमित करु शकतो.

डब्ल्यूएचओच्या (WHO) निवेदनात म्हटले आहे की, काही सस्तन प्राणी इन्फ्लूएंझा विषाणूच्या मिश्रणाचे काम करु शकतात. यातून नवीन विषाणूही तयार होऊ शकतात. हे प्राणी आणि मानव दोघांसाठी अधिक प्राणघातक असू शकतात.

WHO चे प्रमुख काय म्हणाले

जागतिक प्राणी आरोग्य संघटनेचे प्रमुख ग्रेगोरियो टोरेस यांनी सांगितले की, 2022 पासून, किमान 10 देशांमध्ये सस्तन प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. असे आणखी बरेच देश असण्याची शक्यता आहे, जिथे त्याचा प्रादुर्भाव अद्याप वाढलेला नाही.

त्यांनी पुढे सांगितले की, अलीकडे एव्हियन इन्फ्लूएंझाच्या परिस्थितीकी आणि महामारी विज्ञानात मोठा बदल झाला आहे. यामुळे जागतिक चिंता वाढली आहे. हा आजार नवीन भागात पसरला आहे.

Bird Flu Spread In Human
90 टक्के कोल्ड ड्रिंक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम स्वीटनरबाबत WHO चा इशारा, व्यक्त केला कॅन्सरचा धोका

बर्ड फ्लूची लक्षणे

बर्ड फ्लूची लक्षणे बहुतेक प्रकरणांमध्ये मानवांमध्ये सामान्य इन्फ्लूएंझा सारखीच असतात, ज्यामध्ये नाक वाहणे, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि थकवा यांचा समावेश असू शकतो. तथापि, काही प्रकरणांमध्ये हा संसर्गजन्य रोग तीव्रतेच्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो, विशेषत: वृद्ध लोकांमध्ये आणि कमजोर इम्यून सिस्टम असलेल्या लोकांमध्ये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com