India A Women Defeat Australia A: भारत 'ए' महिला संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दमदार सुरुवात केली. 13 ऑगस्ट रोजी ब्रिस्बेन येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया 'ए' संघाचा 4 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर ताहिला विल्सन (7) आणि एलिसा हीली (14) लवकर बाद झाल्या. कर्णधार ताहलिया मॅक्ग्रालाही (9) मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एकवेळ ऑस्ट्रेलियाचा संघ 200 धावांचा टप्पाही गाठणार नाही, असे वाटत होते. मात्र, मधल्या फळीत रेचल ट्रेनामन (51) आणि अनिका लीरॉयड (92) यांनी शानदार भागीदारी केली. लीरॉयडने 90 चेंडूत 92 धावांची खेळी खेळली, ज्यात 8 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाचा डाव 47.5 षटकांत २214 धावांवर संपुष्टात आला.
भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारताकडून (India) राधा यादव हिने सर्वाधिक 3 बळी घेतले. तिने 10 षटकांत 45 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या. तिला तितास साधू आणि मिन्नू मनी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेऊन चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला.
दुसरीकडे, 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर यास्तिका भाटिया (59) आणि शेफाली वर्मा (36) यांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या. या दोघींच्या दमदार खेळीमुळे विजयाचा पाया रचला गेला. यास्तिकाने 70 चेंडूंचा सामना करत 59 धावा काढल्या, तर शेफालीने 31 चेंडूत 36 धावांची आक्रमक खेळी खेळली. यानंतर धारा गुज्जरनेही (31) मोलाचे योगदान दिले. एका क्षणी 155 धावांवर 5 विकेट्स गमावल्यानंतरही भारताने हार मानली नाही.
राघवी बिष्ट आणि राधा यादव यांनी सातव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवले. राघवीने 24 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळी खेळली, तर राधा यादवनेही 19 धावांचे योगदान दिले. अखेर भारताने 42 षटकांत 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून (Australia) लूसी हॅमिल्टन आणि एला हावर्ड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. आता मालिकेतील दुसरा सामना 15 ऑगस्ट रोजी याच मैदानावर खेळला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.