Surya Kumar Yadav Dainik Gomantak
देश

IND vs PAK: टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी की गोलंदाजी? भारतासाठी कोणता पर्याय बेस्ट? हाय होल्टेज सामन्याची उत्सुकता शिगेला; जाणून घ्या दुबई पिच रिपोर्ट

Dubai Stadium Pitch-Weather Report: दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अधिक अनुकूल मानली जाते. संपूर्ण यूएईमध्ये फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरते.

Manish Jadhav

IND vs PAK, Asia Cup 2025: क्रिकेट जगतातील सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीमध्ये रविवारी, 21 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून तो त्यांच्या अंतिम फेरीतील स्थानासाठी निर्णायक ठरु शकतो.

याआधी, ग्रुप-ए च्या साखळी सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवून विजय मिळवला होता. त्यावेळी भारताने (India) अष्टपैलू कामगिरी करत पाकिस्तानला मोठ्या फरकाने हरवले. आता पुन्हा एकदा भारतीय संघाकडून त्याच कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयासाठी सज्ज झाला आहे.

दुबईच्या मैदानावर फिरकीपटूंचे वर्चस्व

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अधिक अनुकूल मानली जाते. संपूर्ण यूएईमध्ये फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरते, परंतु दुबईची खेळपट्टी अबू धाबीच्या तुलनेत अधिक फिरकी गोलंदाजीला मदत करते. त्यामुळे, जर अनुभवी फिरकीपटू अक्षर पटेल पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तर भारतीय संघ तीन फिरकीपटूंना घेऊन मैदानात उतरु शकतो.

दुबईमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला फायदा मिळतो, कारण येथील खेळपट्टीवर नंतर फलंदाजी करणे सोपे जाते. गेल्या पाच टी-20 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने तीन वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी (दुबई)

  • एकूण सामने: 116

  • प्रथम फलंदाजी करुन विजय: 53

  • प्रथम गोलंदाजी करुन विजय: 62

  • पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या: 139

  • सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग: 184/8 (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश)

आकडेवारीनुसार, दुबईुच्या मैदानात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त यश मिळाले आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे दोन्ही संघांसाठी फायदेशीर ठरु शकते.

भारतीय संघाची स्थिती

भारतीय संघाने (Team India) ग्रुप स्टेजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. फलंदाजीमध्ये सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मध्यक्रमात सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांच्यावर धावांची जबाबदारी असेल. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील, तर फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल (जर तंदुरुस्त असेल तर) यांच्यावर असेल. रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू संघाला अधिक बळ देतात.

पाकिस्तान संघाची स्थिती

पाकिस्तानचा संघ ग्रुप स्टेजमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यांनी तीनपैकी एक सामना गमावला आहे. मागील सामन्यातील पराभवातून बोध घेऊन पाकिस्तानचा संघ कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार सलमान अली आगाच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला विजयाची नितांत गरज आहे. फलंदाजीमध्ये फखर जमान आणि शाहीन आफ्रिदीसारख्या खेळाडूंकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. विशेषतः, वेगवान गोलंदाज हारीस राऊफकडून भारतीय फलंदाजांवर दबाव टाकण्याची अपेक्षा आहे.

चाहत्यांमध्ये उत्साह

भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता नेहमीच शिगेला पोहोचलेली असते. दोन्ही देशांतील चाहते हा हाय-व्होल्टेज सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. दुबईतील स्टेडियममध्ये दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असतील. हा सामना केवळ खेळाडूंच्या कौशल्याचा नाही, तर त्यांच्या मानसिक कणखरतेचा देखील कस पाहणार आहे. आजच्या या महामुकाबल्यात कोणता संघ सरस ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भारतीय संघ आपले वर्चस्व कायम राखतो, की पाकिस्तानचा संघ मागील पराभवाचा बदला घेतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

999cc इंजिन, 215 bhp पॉवर अन् 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेग! BMW ची सर्वात दमदार सुपरबाईक भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

Under 11 National Badminton: गोव्याची अमायरा धुमटकर विजेतेपदाच्या उंबरठ्यावर, 11 वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप

SCROLL FOR NEXT