Abhishek Sharma Dainik Gomantak
देश

IND vs PAK Final 2025: हाय-होल्टेज फायनलमध्ये अभिषेक शर्माच्या निशाण्यावर दोन मोठे रेकॉर्ड; 'इतक्या' धावांनी होणार 'विक्रमादित्य'!

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माला या अंतिम सामन्यात आपल्या नावावर दोन मोठे ऐतिहासिक विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे.

Manish Jadhav

IND vs PAK Final 2025: क्रिकेट चाहत्यांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो आशिया कप 2025 चा अंतिम सामना आता केवळ काही तासांवर आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा हाय-व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष युवा भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा याच्यावर केंद्रित झाले आहे, कारण तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अभिषेक शर्माला या अंतिम सामन्यात आपल्या नावावर दोन मोठे ऐतिहासिक विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे.

आशिया कपच्या अंतिम सामन्यातील पहिले शतक

आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात शतक ठोकण्याचा विक्रम आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही. टी-20 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनण्याचा बहुमान अभिषेक शर्माला मिळू शकतो. त्याने जर पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) फायनलमध्ये शतक झळकावले, तर तो थेट इतिहास रचेल आणि आशियाई क्रिकेटमध्ये एक नवीन अध्याय जोडला जाईल. आतापर्यंतच्या स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही.

फक्त 72 धावा दूर

शतक हुकले तरी, अभिषेक शर्माकडे एक मोठा आशियाई विक्रम मोडण्याची संधी आहे. जर अभिषेक शर्माने अंतिम सामन्यात फक्त 72 धावा केल्या, तर तो आशिया चषकाच्या फायनलमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा नवा आशियाई विक्रम आपल्या नावावर करेल.

टी-20 आशिया कपच्या अंतिम सामन्यातील सर्वाधिक धावसंख्येचा सध्याचा विक्रम श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे याच्या नावावर आहे. त्याने 2022 च्या अंतिम सामन्यात 71 धावांची शानदार खेळी केली होती. अभिषेक शर्माच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला, तर हा विक्रम सहज मोडला जाऊ शकतो.

सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या

  • भानुका राजपक्षे (श्रीलंका) - 71 धावा

  • शिखर धवन (भारत) - 60 धावा

  • मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) - 55 धावा

  • विराट कोहली (भारत) - 41* धावा

शिखर धवनचा विक्रमही निशाण्यावर

भारतीय फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम सध्या शिखर धवन याच्या नावावर आहे. धवनने 2016 च्या अंतिम सामन्यात 60 धावांची खेळी केली होती. सध्याच्या फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्मासाठी हा विक्रम मोडणे निश्चितच सोपे असेल.

फायनलसारख्या मोठ्या सामन्यात टीम इंडियाला (Team India) आपला सलामीवीर अभिषेक शर्माकडून वेगवान आणि ठोस सुरुवातीची अपेक्षा आहे. त्याच्या बॅटमधून निघालेली मोठी खेळी भारताला विजेतेपद मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. पाकिस्तानविरुद्धच्या या तिसऱ्या लढतीत अभिषेक केवळ संघाला मजबूत आधारच देऊ शकत नाही, तर वैयक्तिक स्तरावरही तो आशिया चषकाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरु शकतो. तो या मोठ्या मंचावर इतिहास रचतो का, हे पाहणे क्रिकेट चाहत्यांसाठी निश्चितच महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Car Fire Case: मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच! होंडाचे सरपंच शिवदास माडकर यांची जामिनासाठी कोर्टात धाव; पोलिस भलत्यांनाच पकडतायेत!

Horoscope: दांपत्यांसाठी आणि कुटुंबासाठी आनंदाचा दिवस, भावंडांशी मतभेद मिटतील; आर्थिक लाभाची शक्यता

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

SCROLL FOR NEXT