IND vs PAK: 'अभिषेक शर्मा शतक ठोकणार...' सुनील गावस्करांची मोठी भविष्यवाणी, पाकड्यांना धोक्याचा इशारा

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे.
Sunil Gavaskar Prediction
Sunil Gavaskar PredictionDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. २०२५ च्या आशिया कपमध्ये दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले आहेत आणि दोन्ही वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही भारत वर्चस्व गाजवेल का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी अभिषेक शर्माबाबत मोठं भाकित केलं आहे.

गावस्करांचं भाकित – अभिषेक शतक ठोकणार

इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले,"अभिषेक शर्मा संधी हातून जाऊ देणार नाही. तो उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि त्याने आधीच तीन अर्धशतकं झळकावली आहेत. बांगलादेशविरुद्ध धावबाद झाल्यामुळे शतक हुकलं होतं, पण आता अंतिम सामन्यात तो मोठी खेळी खेळेल आणि कदाचित शतकही ठोकू शकेल." गावस्करांच्या या विधानामुळे अभिषेककडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

Sunil Gavaskar Prediction
Goa Police: जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 'NSA' कायदा लागू करण्याचा अधिकार द्या, गोवा पोलिसांचा राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण प्रस्ताव

अभिषेक शर्माची कामगिरी

२०२५ च्या आशिया कपमध्ये अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली आहे.

  • ६ सामन्यांत ३०९ धावा

  • ३ अर्धशतकं

  • ५१.५० चा सरासरी धावफलक

  • २०४.६३ चा स्ट्राईक रेट
    पाकिस्तानविरुद्धच्या गट-सामन्यात त्याने ७४ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Sunil Gavaskar Prediction
Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

शोएब अख्तरचा पाकिस्तानला सल्ला

दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला थेट सल्ला दिला आहे. तो म्हणाला, "फक्त विकेट्स घ्या. २० षटके टाकण्याची गरज नाही. भारताला लवकर धक्का द्या. जर अभिषेक शर्मा लवकर बाद झाला, तर पाकिस्तानसाठी मोठा फायदा ठरेल."

अभिषेक शर्माच्या तुफानी फॉर्ममुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये एकप्रकारची धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात अभिषेक शर्मा निर्णायक खेळी करतो का, की पाकिस्तान त्याला लवकर बाद करण्यात यशस्वी ठरतो, हे पाहणं अत्यंत रोमांचक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com