Yashasvi Jaiswal  Dainik Gomantak
देश

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Yashasvi Jaiswal Record: यशस्वीने या महत्त्वाच्या सामन्यात 58 धावांची दमदार खेळी केली. त्याने केएल राहुलसोबत मिळून भारताला 94 धावांची शानदार सलामी दिली.

Manish Jadhav

Yashasvi Jaiswal Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा (India) युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने एक नवा इतिहास रचला. गेल्या 50 वर्षांत ओल्ड ट्रॅफर्डवर अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला.

यशस्वीची दमदार खेळी आणि भागीदारी

दरम्यान, यशस्वीने या महत्त्वाच्या सामन्यात 58 धावांची दमदार खेळी केली. त्याने केएल राहुलसोबत मिळून भारताला 94 धावांची शानदार सलामी दिली. आपल्या या अर्धशतकी खेळीत यशस्वीने 10 चौकार आणि एक षटकार मारला. त्याने सुरुवातीला संयमी खेळ दाखवला, पण 20 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. 107 चेंडूंमध्ये त्याने 58 धावांची खेळी साकारली.

50 वर्षांचा विक्रम मोडला

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारतीय सलामीवीराने अखेरचे अर्धशतक 1974 मध्ये सुनील गावस्कर यांनी झळकावले होते. तब्बल 50 वर्षांनंतर यशस्वीने हा विक्रम मोडत आपले नाव इतिहासात कोरले.

इंग्लंडविरुद्ध 1000 कसोटी धावा पूर्ण

तसेच, या खेळीदरम्यान यशस्वीने इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पाही पूर्ण केला. तो इंग्लंड संघाविरुद्ध दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज बनला. डावखुरा फलंदाज असलेल्या यशस्वीने इंग्लंडविरुद्धच्या 16 कसोटी डावांमध्ये आतापर्यंत 66 च्या सरासरीने 10003 धावा केल्या आहेत. यात तीन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्याने दोन द्विशतके देखील झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'जे गोव्यात परतले, त्‍यांचीही पर्यटक म्‍हणून नोंद'! लोबोंचा ‘घरचा आहेर’; पर्यटनमंत्र्यांनी दिला बदनामी न करण्याचा सल्ला

Goa GMC: 'गोमेकॉ'मध्ये आणताना 88 रुग्‍ण दगावले! विधानसभेत आरोग्‍यमंत्र्यांच्या उत्तरातून माहिती समोर

Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

Dog Attack: बोगमाळोत कुत्र्याने घेतला पादचाऱ्याचा चावा, रहिवाशाविरुद्ध वास्को पोलिसांत गुन्हा दाखल

Parra: 'आमच्यावरील गुन्हे मागे घ्या'! भूमिका, साखळेश्वर देवस्थान वाद; पर्येतील शेकडो नागरिकांची पोलिस स्थानकावर धडक

SCROLL FOR NEXT