
KL Rahul Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर केएल राहुलने 11 धावा करुन एक खास विक्रम आपल्या नावावर केला. त्याने इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या असून अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. या विक्रमासह त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अव्वल स्थानी आहे. तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडमध्ये 17 कसोटी सामन्यांमध्ये 54.31 च्या सरासरीने 1575 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे. द्रविडने इंग्लंडमध्ये 13 सामन्यांमध्ये 68.80 च्या सरासरीने 1376 धावा केल्या आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर भारताचे (India) माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर आहेत. इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 16 सामन्यांमध्ये 1152 धावा केल्या आहेत. माजी भारतीय कर्णधार विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंडमध्ये 17 सामन्यांमध्ये 33.21 च्या सरासरीने 1096 धावा केल्या आहेत.
मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात 11 धावा करुन, केएल राहुलने आता इंग्लंडमध्ये 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 13 कसोटी सामन्यांमध्ये 1008 धावा केल्या आहेत. त्याची धावांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. या सामन्यात त्याच्याकडे या यादीत विराट कोहलीला मागे टाकण्याची संधी असेल.
सचिन तेंडुलकर: 1575 धावा
राहुल द्रविड: 1376 धावा
सुनील गावस्कर: 1152 धावा
विराट कोहली: 1096 धावा
केएल राहुल: 1008* धावा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.