KL Rahul  Dainik Gomantak
देश

IND vs ENG 4th Test: केएल राहुलच्या निशाण्यावर मोठे रेकॉर्ड, सचिन आणि गावस्कर यांच्या 'खास क्लब'मध्ये होणार एंट्री!

KL Rahul Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.

Manish Jadhav

KL Rahul Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. बुधवारपासून (23 जुलै 2025) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळवला जाणार असून, भारतीय संघासमोर मोठे आव्हान आहे. जर भारतीय संघ हा सामना हरला, तर इंग्लंड मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेईल आणि अंतिम सामना केवळ औपचारिकता बनेल. अशा परिस्थितीत, गिल सेना कोणत्याही परिस्थितीत मँचेस्टर कसोटी जिंकून मालिकेत आपले आव्हान कायम ठेवू इच्छिते.

स्टार फलंदाजांवर मोठी जबाबदारी

आत्तापर्यंतच्या मालिकेत भारताच्या अनेक फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले आहे, परंतु कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी सर्वाधिक प्रभावित केले आहे. हे तिन्ही खेळाडू सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांच्या यादीत समाविष्ट आहेत. मँचेस्टर कसोटीत जर त्यांची बॅट तळपली, तर अनेक विक्रम मोडले जाऊ शकतात. भारतीय सलामीवीर केएल राहुलकडून (KL Rahul) चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत, कारण त्याने या मालिकेत अनेक वेळा कठीण परिस्थितीत भारतीय संघाची इनिंग सांभाळण्याचे काम केले आहे. आता त्याच्याकडे मोठी कामगिरी करण्याची उत्तम संधी आहे.

केएल राहुल खास क्लबमध्ये होणार सामील?

दरम्यान, राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. यासाठी त्याला फक्त 60 धावांची गरज आहे. जर त्याने मँचेस्टरमध्ये ही कामगिरी साधली, तर तो 9000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा 16वा भारतीय क्रिकेटर बनेल आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), विराट कोहली, राहुल द्रविड यांसारख्या दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील होईल. केएल राहुलने आतापर्यंत 218 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 8940 धावा केल्या आहेत.

जबरदस्त फॉर्म

सध्याच्या मालिकेत राहुल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 62.50 च्या सरासरीने 375 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. जर त्याने आणखी 19 धावा जोडल्या, तर तो 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी मालिकेत केलेल्या 393 धावांचा स्वतःचाच विक्रम मागे टाकेल.

इतकेच नाही, तर तो इंग्लंडमध्ये 1000 कसोटी धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. सध्या, त्याच्या नावावर इंग्लंडमध्ये 12 कसोटी सामन्यांमध्ये 41.20 च्या सरासरीने 989 धावा आहेत, ज्यात चार शतके आणि दोन अर्धशतके आहेत. जर त्याने ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आणखी 11 धावा केल्या, तर तो सचिन तेंडुलकर (1575 धावा), राहुल द्रविड (1376 धावा) आणि सुनील गावस्कर (1152 धावा) यांच्यानंतर ही कामगिरी करणारा चौथा भारतीय फलंदाज बनेल. मँचेस्टर कसोटीत केएल राहुलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT