
Jasprit Bumrah Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. या मालिकेत त्याने खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये प्रत्येकी एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला. आता 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीतही बुमराहकडे काहीतरी विशेष करण्याची संधी आहे. जर बुमराहने मँचेस्टरमध्ये पुन्हा एकदा 5 बळी (फाइव्ह विकेट हॉल) घेतले, तर तो पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानला (Imran Khan) मागे सोडेल.
दरम्यान, बुमराह ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो मँचेस्टरमध्येही कमाल करु शकतो असे दिसत आहे. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने पुन्हा एकदा एका डावात 5 बळी घेतले, तर त्याची ही 'फाइव्ह विकेट हॉल'ची हॅटट्रिक तर होईलच, पण तो इम्रान खानचा मोठा विक्रमही मोडेल.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक 'फाइव्ह विकेट हॉल' घेणारा आशियाई वेगवान गोलंदाज बनण्याची संधी बुमराहकडे आहे. बुमराहने आतापर्यंत इंग्लंडमध्ये (England) 4 वेळा 'फाइव्ह विकेट हॉल' घेतले आहेत. इम्रान खानच्या नावावरही इंग्लंडमध्ये तेवढेच 'फाइव्ह विकेट हॉल' आहेत. आता जर बुमराहने आणखी एकदा ही किमया साधली, तर तो या बाबतीत नंबर 1 परदेशी वेगवान गोलंदाज बनेल. इतकेच नाही, तर 1982 नंतर मँचेस्टरच्या मैदानावर 5 बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.
भारतीय संघ कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. मँचेस्टरमध्ये विजय मिळवण्यासाठी बुमराहला उत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे, मँचेस्टर कसोटीत वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टी मिळण्याची अपेक्षा आहे.
बुमराहने आतापर्यंत कसोटी मालिकेत 12 बळी घेतले आहेत, हे जरी खरे असले तरी, त्याने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी अद्याप केलेली नाही, असे काही जणांचे मत आहे. बुमराहसाठी मँचेस्टर कसोटी खूप खास असेल, कारण तो या मैदानावर पहिल्यांदाच खेळताना दिसेल. आता या मैदानाची खेळपट्टी बुमराहला किती साथ देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.