Tripura Assembly elections Dainik Gomantak
देश

त्रिपुराच्या 3 विधानसभा जागांवर फुलले कमळ, काँग्रेसला 1 जागेवर मानावे लागले समाधान

23 जूनला त्रिपुरातील चार विधानसभा जागांवर झालेल्या मतदानाचा निकालही जाहीर झाला आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील तीन लोकसभा आणि 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत तर आज म्हणजेच 26 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. 23 जूनला त्रिपुरातील चार विधानसभा जागांवर झालेल्या मतदानाचा निकालही जाहीर झाला आहे. भाजपने 4 पैकी 3 जागा जिंकल्या आहेत तर दुसरीकडे काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे. (In Tripura Assembly elections BJP has won 3 seats while Congress has won 1 seat)

या चार जागांवरील टीएमसी चौथ्या क्रमांकावर आहे. भाजपचे उमेदवार तसेच मुख्यमंत्री माणिक साहा (Manik Saha) हे त्रिपुराच्या टाउन बारडोली मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ते 6104 मतांनी विजय आपल्या नावावर केला आहे. माणिक साहा यांना 17181 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार आशिषकुमार साहा यांना 11077 मते मिळाली आहेत. तर TMC उमेदवाराला 986 मते मिळाली आहेत.

दुसरीकडे, सूरमा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला. तसेच भाजपच्या उमेदवार स्वप्ना दास (पॉल) यांना 16677 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला 8415 मते मिळाली आहेत. तर TMC उमेदवाराला 1341 मते मिळाली आहेत.

दुसरीकडे जुबराजनगर विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मलिना देबनाथ यांनी सीपीआय (मार्क्स) उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला आहे. मलिना देबनाथ यांना 18769 मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवाराला 1440 मते मिळाली आहेत. तर माकपला 14197 मते मिळाली आहेत. तर टीएमसीला 1080 मते मिळाली.

याच आगरतळ्यात काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून विजय आपल्या नावावर केला आहे. भाजपचे उमेदवार अशोक सिन्हा यांना 14268 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार सुदीप रॉय बर्मन यांना 17241 मते मिळाली आहेत.

तर टीएमसीचे उमेदवार पन्ना देब यांना 830 मते मिळाली तर सीपीआय(एम) उमेदवाराला 6736 मते मिळाली आहेत. या चार विधानसभांच्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर भाजपला 44.90 टक्के मते मिळाली. तसेच काँग्रेसला 20.10 टक्के, सीपीआय(एम)ला 19.75 टक्के आणि टीएमसीला 2.85 टक्के मते मिळाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT