शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून 'Y+' सुरक्षा

15 बंडखोर शिवसेना आमदारांना सशस्त्र केंद्रीय राखीव पोलीस दल जवानांचे 'Y+' श्रेणीचे सुरक्षा कवच प्रदान केले आहे.
MLAs of Shiv Sena
MLAs of Shiv SenaDainik Gomantak

महाराष्ट्रात (Maharashtra) सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, केंद्राने एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या 15 बंडखोर शिवसेना आमदारांना सशस्त्र केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) जवानांचे 'Y+' श्रेणीचे सुरक्षा कवच प्रदान केले आहे. (Y + security from Center Government to 15 rebel MLAs of Shiv Sena)

MLAs of Shiv Sena
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डीजीपी रजनीश सेठ आणि इतरांना पत्र लिहून बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना दिलेले सुरक्षा कवच काढून घेण्यात आल्याचा आरोप केल्याच्या एक दिवसानंतर हे घडले. तर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते.

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात येत असल्या नंतर शिंदे यांचे संतप्त पत्र आले आहे. दरम्यान रविवारी, ठाकरे यांच्या शिवसेनेने रस्त्यावर उतरण्याची धमकी दिल्याने पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी शिंदे यांनी आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत तळ ठोकलेल्या आमदारांची बैठक बोलावली होती.

MLAs of Shiv Sena
By-polls result : लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकींचे निकाल आज होणार जाहीर

288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेच्या 55 पैकी किमान 38 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला. एकतर शिंदे पक्ष सोडू शकतात आणि दुसरा राजकीय पक्ष बनवू शकतात किंवा दुसर्‍या पक्षात विलीन होऊ शकतात, या दोन्हीचा परिणाम सध्याच्या एमव्हीए सरकारला होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com