AAP Dainik Gomantak
देश

AAP: भरविधानसभेत आपच्या आमदाराने नोटांचे बंडल काढले, म्हणाले; भाजप...

AAP: ते आपल्याला ठार मारू शकतात. अशी भिती व्यक्त करताना, या लाच घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असीही मागणी आमदार गोयल यांनी केली.

दैनिक गोमन्तक

AAP: दिल्लीच्या विधानसभेत सलग तिसऱ्या दिवशी गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे. आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी भर विधानसभेत नोटांचे बंडल फडकावत त्यांना भाजपने आपल्याला 15 लाख रुपए लाच दिल्याचं म्हटले आहे.

गोयल यांनी आधी लाच घेतली व पोलिसां( Police)ना याची माहिती मिळताच त्यांनी उलट आरोप सुरु केले आहेत असं भाजप नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनी म्हटले आहे. गोयल यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले आहे की दिल्ली सरकारच्या बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात परिचारिका व अन्य पदांच्या भरतीसाठी टेंडर काढण्यात आले आहे.

80 टक्के जुन्या कर्मचाऱ्यांना कायम करावे लागते असा शासनाचा नियम आहे. परंतु त्यासाठी लाच मागितली जात आहे. ठेकेदाराने या प्रकारात आमदारांना सहभागी करून घेण्यासाठी मलाही लाच देण्याचा प्रयत्न केला. मी त्याला रंगेहात पकडण्यासाठी 15 लाख रुपए घेतले परंतु तशी माहिती मी पोलीस आयुक्तांना आधीच दिली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. ही लाचखोरी उघड करताना आपण जीव धोक्यात घातला आहे. ते आपल्याला ठार मारू शकतात. अशी भिती व्यक्त करताना, या लाच घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असीही मागणी आमदार गोयल यांनी केली. .

दरम्यान, विधानसभेत आज भाजप आमदारांनी यमुनेच्या प्रदूषणावरून प्रचंड गदारोळ केला. आमदार अनिल वाजपेयी आणि ओ पी शर्मा यांना मार्शल्सनी खांद्यावर उचलून सभागृहाबाहेर नेले. त्यानंतर भाजप(BJP) आमदारांनी सभात्याग केला व विधानसभेबाहेर त्यांनी निदर्शने केल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT