Girlfriend Dainik Gomantak
देश

'अधुरा मिलन', प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराचा काढला काटा

रहिमाबादमध्ये मैत्रिणीला (Girlfriend) भेटण्यासाठी घरी पोहोचलेल्या रोहितची चाकूने हत्या करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

लखनौच्या जुगराजगंज, रहिमाबादमध्ये मैत्रिणीला भेटण्यासाठी घरी पोहोचलेल्या रोहितची चाकूने हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या चुलत भावाने रोहितला घराच्या भिंतीवर चढताना पाहिले होते. त्यानंतर आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. फरार आरोपीचा पोलीस (Police) शोध घेत आहेत. (In Rahimabad Lucknow a lover was killed when he reached home to meet his girlfriend)

एसपी ग्रामीण हृदयेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, माल काकराबादमध्ये राहणारा रोहित कुमार याची काजलशी मैत्री होती. शनिवारी काजलचे कुटुंबींय एका लग्न समारंभासाठी गेले होते. तेव्हा काजल घरी एकटीच होती. याबाबत माहिती मिळताच रोहित रात्री एक वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी पोहोचला. भिंतीवर चढत असताना रोहीतला काजलचा चुलत भाऊ अमित याने पाहिले. पाठलाग करत अमित रोहितपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर त्याने त्याच्यावर चाकूने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रोहित जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. मात्र काही पावले चालल्यानंतर तो अडखळला आणि पडला.

एसपी ग्रामीणने दिलेल्या माहितीनुसार, रोहितचा मृतदेह त्याच्या मैत्रिणीच्या (Girlfriend) घरात पडून होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. त्याचवेळी पोलीस खून करणाऱ्या अमितचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IIT Campus: मेळावलीतील जमीन पुन्हा ताब्यात घेणार; 'आयआयटी गोवा' स्थलांतर प्रकल्पावर सरकारकडून पडदा

Goa Smart Meter: 'स्मार्ट मीटर जोडणी तत्काळ रद्द करा', काँग्रेस नेते अमित पाटकर आक्रमक; 7 दिवसांत निर्णय न झाल्यास पुन्हा वीज खात्यावर धडक मोर्चा

खरी कुजबुज: शिवसेनेच्या छत्र्यांना मागणी

Goa Monsoon: 'मान्सून'चं कमबॅक; मुसळधार सरींमुळे 20 जूनला 71 टक्के असलेली तूट 52.9 टक्क्यांवर, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा

वेर्णा बायपास वृक्षतोड प्रकरण: झाडांच्या पुनर्रोपणासाठी नियमावली तयार करा, कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT