जम्मु काश्मिरच्या IAF Station वर झालेला हल्ला हा ड्रोनद्वारे (Drone Attack) केलेला पहिलाच दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) होता. अशा प्रकारचा ड्रोन हल्ला होणं हे सुरक्षा व्यवस्थेसमोरचे भविष्यातील मोठं आव्हान असल्याने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी देशाचे पंतप्रधआन नरेंद्र मोदी (Narendra Modi)आणि लष्कराच्या वरिष्ट अधिकाऱ्यांमध्ये आज बैठक पार पडली . येणाऱ्या काळात अशा पद्धतींच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारची योजना आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणांचा वापर यांसारख्या मुद्दयांवर या बैठकीत चर्चा झाली असल्याचे समजते आहे. (Important decision was taken at the Central Security Committee meeting to stop the drone attacks)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांच्यासह नागरी उड्डाण मंत्रालयाचे अधिकारी देखील उपस्थित होते. दोन तासांच्या या बैठकीत देशातील ड्रोन कंपन्यांकडुन होणारा ड्रोनचा वापर यांसारख्या मुद्दयांवर एक व्यापक धोरण ठरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे.
सरकारी सूत्रांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार "संरक्षण क्षेत्रातील भविष्यातील आव्हानांवर आणि सैन्याला आधुनिक उपकरणे सुसज्ज करण्यावर चर्चा झाली. तसेच अधिकाधिक तरुण, स्टार्ट-अप्स सहभागी करुन घेण्याच्या मुद्दयावर देखील चर्चा झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.