Monsoon Season 2024 Dainik Gomantak
देश

Monsoon Season 2024: आनंदाची बातमी! यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

Monsoon Season 2024: येत्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त म्हणजे 106 टक्के पावसाची नोंद होईल.

Pramod Yadav

Monsoon Season 2024

भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त म्हणजे 106 टक्के पावसाची नोंद होईल. देशात 87 सेंटीमीटर पाऊस पडेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अल निनोचा प्रभाव मान्सूनआधी कमी होणार आहे. कवकुवत ला निनाची परिस्थिती निर्माण होईल. याचा फायदा चांगल्या मान्सूनसाठी होईल. 08 जूनपर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे.

अल निनोची स्थिती सध्या साधारण आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपलेला असेल. भारतातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. चांगल्या पावसाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे हाल होतात.

शिवाय, पिण्याचा-सांडपाण्याचा प्रश्न देखील सध्या गंभीर बनला आहे. अनेक धरणे कोरडी पडली आहेत. अनेक धरणांमध्ये काही दिवस पुरेल इतका पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.

चांगल्या पावसामुळे अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळते. त्यामुळे मान्सूनकडून अनेकांना अपेक्षा असतात.

1974, 2,000 साली सरासरीपेक्षा कमी पाऊस

आयएमडीच्या विश्लेषणानुसार, 1974 आणि 2,000 या केवळ दोन वर्षांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रवीचंद्रन म्हणाले की, उत्तर गोलार्धात बर्फाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल.

याच कारणामुळे दक्षिणपश्चिम भागात मान्सूनच्या काळातील पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

SCROLL FOR NEXT