Delhi Excise Scam: आपच्या प्रचारासाठी गोवा विधानसभा निवडणुकीत 45 कोटी हस्तांतरीत केलेल्या 'चनप्रीत'ला अटक

Delhi Excise Scam: मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) त्याला अटक करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकृत सूत्रांनी सोमवारी सांगितले.
Delhi Liquor Scam
Delhi Liquor ScamDainik Gomantak

Delhi Excise Scam

अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. कथित घोटाळ्यातील पैसा गोवा विधानसभा निवडणुकीसाठी हस्तांतरीत केल्याप्रकरणी ईडीने चनप्रीत सिंगला अटक केलीय.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) त्याला अटक करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकृत सूत्रांनी सोमवारी सांगितले.

दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाची ही 17वी अटक आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांचा मुक्काम तिहार तुरुंगात आहे.

चनप्रीत सिंग यालाही यापूर्वी सीबीआयने याच प्रकरणात अटक केली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या एफआयआरमधून मनी लाँड्रिंग प्रकरण समोर आले आहे.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'साठी प्रचार करणाऱ्या सर्वेक्षण कामगार, क्षेत्र व्यवस्थापक, असेंब्ली मॅनेजर आणि इतरांना चनप्रीत सिंगने रोख पैसे हस्तांतरीत केल्याचे, ईडीने यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते.

Delhi Liquor Scam
Goa BJP slams K'taka CM: 'स्वत:च्या राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या', गोवा भाजपने सिद्धरामय्यांवर टीका का केली?

बीआरएस नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता, उद्योगपती सरथ चंद्र रेड्डी आणि इतरांचा समावेश असलेल्या 'दक्षिण ग्रुप'ने उत्पादन शुल्क धोरणाअंतर्गत मुख्य मद्य बाजारपेठ मिळविण्यासाठी 'आप'ला 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप एजन्सीने केला आहे.

आप सरकारचे 2021-22 साठीचे उत्पादन शुल्क धोरण त्यानंतर रद्द करण्यात आले आहे. कथित घोटाळ्यातून मिळालेल्या पैशांपैकी 45 कोटी रुपये आपने गोवा निवडणूक प्रचारासाठी वापरल्याचा आरोप, एजन्सीने केलाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com