Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: ''जेव्हा सरकार बदलेल, तेव्हा लोकशाही कमजोर करणाऱ्यांना...''; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi Criticized BJP: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

Rahul Gandhi Criticized BJP: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह सर्व विरोधी पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. भाजप पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीत पणाला लावणार आहे. तर दुसरीकडे, कॉंग्रेससह सर्वच राजकीय पक्ष भाजपचा हा विजयी रथ रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान, कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, ''जेव्हा सरकार बदलेल तेव्हा लोकशाही कमजोर करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल. ही माझी गॅरंटी आहे. अशी कारवाई केली जाईल की पुन्हा हे सर्व करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.'' 15 मार्चचा व्हिडिओ शेअर करताना राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये या गोष्टी लिहिल्या आहेत.

एक दिवस सरकार बदलेल- राहुल गांधी

या व्हिडिओत राहुल गांधी म्हणाले की, ''जर सीबीआय आणि ईडीने त्यांचे काम केले असते तर असे झाले नसते. जेव्हा सरकार बदलेल तेव्हा लोकशाही कमजोर करण्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल. याची मी गॅरंटी देतो.''

मनरेगाच्या संदर्भात आक्षेप घेतला

केंद्र सरकारविरोधात राहुल गांधी सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. काल त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) मजुरी 4 रुपयांवरुन 10 रुपये प्रतिदिन वाढवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला. राहुल म्हणाले की, मनरेगा कामगारांची मजुरी सरकारने 7 रुपयांवरुन 10 रुपयांपर्यंत वाढली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरी सुधारित करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध राज्यांसाठी चार ते 10 टक्के वाढ करण्यात आली आहे.

एका अधिसूचनेनुसार, हरियाणामध्ये या योजनेंतर्गत अकुशल कामगारांसाठी प्रतिदिन 374 रुपये सर्वात जास्त वेतन आहे, तर अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये सर्वात कमी 234 रुपये आहे. राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, “मनरेगा कामगारांचे अभिनंदन! पंतप्रधानांनी तुमच्या वेतनात सात रुपयांची वाढ केली आहे. आता कदाचित तुम्हाला ते विचारतील की, 'एवढ्या मोठ्या रकमेचे तुम्ही काय कराल? आता तुमच्या नावाने 'धन्यवाद मोदी'ची मोहीम सुरु करतील.''

काँग्रेसला तरुणांचे भविष्य घडवायचे आहे- राहुल गांधी

याआधी मंगळवारी राहुल गांधी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. आपल्या पक्षाला तरुणांचे भविष्य घडवायचे आहे आणि भाजपला त्यांची दिशाभूल करायची आहे, असे ते म्हणाले होते. राहुल गांधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हणाले की, “नरेंद्र मोदी जी, तुमच्याकडे रोजगारासाठी काही योजना आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक तरुणाच्या ओठावर आहे. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात भाजपच्या लोकांना विचारले जात आहे - दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन का दिले?'' काँग्रेसने 'युवा न्याय' अंतर्गत रोजगार क्रांतीचे वचन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT