Cristiano Ronaldo Retirement: फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का! ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर, म्हणाला, 'हे माझं शेवटचं...'

Cristiano Ronaldo retirement news: फुटबॉलविश्वातील एका महान पर्वाच्या अखेरची चाहूल लागली आहे. पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू आणि पाच वेळचा बॅलन डी’ओर विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डो याने निवृत्तीबाबत मोठे संकेत दिले आहेत.
Cristiano Ronaldo Retirement
Cristiano Ronaldo RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

फुटबॉलविश्वातील एका महान पर्वाच्या अखेरची चाहूल लागली आहे. पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू आणि पाच वेळचा बॅलन डी’ओर विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डो याने निवृत्तीबाबत मोठे संकेत दिले आहेत. सध्या सुरू असलेला हंगाम हा खेळाडू म्हणून त्याचा शेवटचा हंगाम ठरू शकतो, असे त्याने म्हटले आहे. रोनाल्डोच्या या वक्तव्यानंतर जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

रोनाल्डोने दिला निवृत्तीचा मोठा संकेत

४१ वर्षीय रोनाल्डोने एका मुलाखतीदरम्यान आपल्या भविष्याबाबत भाष्य केले. फुटबॉल कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आपण पोहोचलो असल्याची जाणीव त्याला आहे. मात्र निवृत्तीची ठोस तारीख त्याने अद्याप जाहीर केलेली नाही. आपल्या कारकिर्दीचा शेवट संस्मरणीय असावा आणि मैदानावर मोठा वारसा मागे ठेवायचा आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली.

रोनाल्डोचा सौदी अरेबियातील अल नासर क्लबसोबतचा करार जून २०२७ पर्यंत आहे. त्यामुळे त्याच्या कराराचा कालावधी संपण्यापूर्वीच तो निवृत्ती घेणार का, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

Cristiano Ronaldo Retirement
Goa Cricket Association: अनधिकृत क्रिकेट स्पर्धांत खेळणे महागात पडणार; 'जीसीए'चा नोंदणीकृत खेळाडूंना कडक इशारा

२०२६ चा वर्ल्ड कप ठरला शेवटचा?

रोनाल्डोने यापूर्वीही आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटाबाबत संकेत दिले होते. त्याने २०२६ चा फिफा वर्ल्ड कप हा आपल्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असेल, असे स्पष्ट केले होते. यानंतर त्याने राष्ट्रीय संघातून निवृत्ती कधी घेणार, याबाबत मात्र कोणतीही निश्चित घोषणा केली नव्हती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही रोनाल्डोने आणखी एक-दोन वर्षे खेळण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे त्याच्या ताज्या वक्तव्यामुळे आता निवृत्तीचा निर्णय जवळ आल्याचे मानले जात आहे.

फुटबॉलनंतर कुटुंबाला देणार अधिक वेळ

मैदानावरील कारकिर्दीनंतरच्या आयुष्याची तयारीही रोनाल्डोने सुरू केल्याचे सांगितले. फुटबॉलमधून दूर झाल्यानंतर कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची त्याची इच्छा आहे. गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ त्याचे आयुष्य प्रशिक्षण, सामने, प्रवास आणि प्रचंड मेहनतीभोवती फिरत राहिले.

फुटबॉल सोडल्यानंतर निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी विविध गोष्टी करण्याचा विचार त्याने व्यक्त केला आहे. प्रवास, पॅडल खेळणे आणि इतर आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्याची त्याची इच्छा आहे. आतापर्यंत मिळवलेल्या यशाचा आनंद घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही त्याला वाटते.

स्पोर्टिंगपासून अल नासरपर्यंतचा प्रवास

रोनाल्डोने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात स्पोर्टिंग सीपीकडून केली. त्यानंतर मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद आणि युव्हेंटससारख्या जगातील आघाडीच्या क्लबचे प्रतिनिधित्व करत त्याने फुटबॉलच्या इतिहासात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

विशेषतः रियल माद्रिदसोबतचा त्याचा काळ अत्यंत यशस्वी ठरला. या क्लबकडून त्याने ४३८ सामने खेळताना तब्बल ४५० गोल केले. क्लब फुटबॉलमधील त्याच्या विक्रमांमुळे तो रियल माद्रिदच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक मानला जातो.

Cristiano Ronaldo Retirement
Goa Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; 'त्या' तिघांच्या जामिनावर 18 रोजी निकाल, आव्हान याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण

२५ वर्षांच्या कारकिर्दीचा पडदा पडणार?

जानेवारी २०२३ पासून रोनाल्डो अल नासरकडून खेळत आहे. वयाच्या ४१व्या वर्षीही त्याची गोल करण्याची क्षमता आणि मैदानावरील प्रभाव कायम आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा होत असली तरी चाहत्यांना अजून काही काळ त्याला मैदानावर पाहायला मिळावे, अशी अपेक्षा आहे.

रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत असंख्य विक्रम, विजेतेपद आणि वैयक्तिक पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळे जर त्याने याच काळात निवृत्तीचा निर्णय घेतला, तर फुटबॉलच्या इतिहासातील एका प्रदीर्घ आणि अविस्मरणीय अध्यायाचा अंत होईल.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com