आशिया कप २०२५ चा दुसरा सुपर फोर सामना टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात रंगला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला आक्रमक खेळाने पराभूत केले, आणि या विजयाने भारताच्या खेळाडूंच्या आत्मविश्वासाला मोठा बळ मिळाले. मात्र सामन्यादरम्यान पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफच्या चिथावणीखोर आणि असभ्य हावभावांमुळे सामना चर्चेचा विषय बनला.
सामन्यादरम्यान हरिस रौफने सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांकडे “६-०” असा हावभाव केला, तसेच प्लेन क्रॅश'ची नक्कल केली होती. त्याच्या या वर्तनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तक्रार करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडे याबाबत कारवाईची मागणी केली.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आज आयसीसीने सुनावणी घेतली आणि हरिस रौफला आयसीसीच्या आचारसंहितेनुसार लेव्हल १ च्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. खेळाची बदनामी केल्याबद्दल त्याला कडक दंड ठोठावण्यात आला आहे. हरिस रौफच्या मॅच फीच्या अंदाजे ३० टक्के रक्कम वजा करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर दंडाची नेमकी रक्कम अद्याप स्पष्ट झालेली नाही.
टीम इंडियाने आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आधीचे दोन सामनेही टीम इंडियाच्या विजयाने समाप्त झाले आहेत. यंदा दोन्ही संघांचा सामना आशिया कपच्या अंतिम फेरीत, २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. ही दोन्ही संघांमधील तिसरी लढत ठरणार आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारतीय संघाच्या फॅन्सना आशा आहे की त्यांच्या खेळाडूंचा हे प्रर्दशन अंतिम सामन्यातही पराक्रम दाखवेल, तर पाकिस्तानच्या संघाला हरिस रौफच्या वर्तनामुळे आणि मानसिक दबावामुळे सामना आणखी आव्हानात्मक ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.